देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : सुप्रीम कोर्टाने २७% ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने त्याचा फटका देहू नगरपरिषद निवडणुकीस बसला आहे. देहूतील चार प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाने हा आदेश जारी केल्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकांवर गंडांतर आले आहे. याबाबतचा आदेश आज देहू ग्रामपंचायतीला मिळाला. ओबीसी आरक्षित वार्डातील निवडणुका स्थगित ठेवून बाकीचा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू ठेवावा, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे देहूचा ११, १२ आणि १४ व १५ या वॉर्डांचे निवडणूक स्थगित ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, आज (मंगळवारी) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ५१ जणांनी ८१ अर्ज भरले आहेत. मात्र ऑनलाईन अर्ज नसल्यामुळे अर्जाची नेमकी स्थिती कळाली नाही. वरील चार वार्डातील अर्ज बाद ठरवण्यात येईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ए बी फॉर्म मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा