Pune Police AI Goggles: पुणे पोलिसांची ‘थर्ड आय’; एआय गॉगलमधून ड्रोनचे लाइव्ह दृश्य थेट डोळ्यांसमोर

गणेश विसर्जन मिरवणुकीत तंत्रज्ञानाचा अभिनव वापर; गर्दी आणि आकाशातील हालचालींवर एकाच वेळी नजर
Police AI Goggles
Police AI GogglesPudhari
Published on: 
Updated on: 

महेंद्र कांबळे

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीतील तुफान गर्दीवर जमिनीवरून पोलिसांची नजर होतीच; मात्र यंदा पुणे पोलिसांनी या नजरेला आकाशातील 'थर्ड आय'ची जोड दिली. पोलिसांनी वापरलेल्या एआय-बेस्ड गॉगलमुळे आकाशात उडणाऱ्या ड्रोनचे थेट दृश्य पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोरच उपलब्ध झाले. त्यामुळे समोरची मिरवणूक आणि गर्दीवर लक्ष ठेवतानाच वरून दिसणाऱ्या हालचालीही एकाच वेळी पाहता आल्या. ड्रोनचे दृश्य पाहण्यासाठी वारंवार मोबाईल हातात घेण्याची गरजच भासली नाही. या प्रकारचे दोन गॉगल ड्रोनशी संलग्न करण्यात आले होते.

Police AI Goggles
Pune Heavy Rain: पुण्यात वादळी पावसाची हजेरी; १८ ठिकाणी झाडे उन्मळली

विसर्जनासाठी शहरात १० पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात होते. सीसीटीव्ही, एआयच्या माध्यमातून व्हिडीओ विश्लेषण, महत्त्वाच्या ठिकाणी फेस रिकग्निशन कॅमेरे आणि ड्रोन असा तगडा बंदोबस्‍त ठेवला होता. या व्यवस्थेत गॉगलने आकाशातील ड्रोनचे चित्र थेट मैदानावरील अधिकाऱ्यांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचवले. गर्दीत बंदोबस्त करताना जवळची आणि दूरची परिस्थिती एकाच वेळी समजून घेणे महत्त्वाचे असते.

Police AI Goggles
Pune Peoples Bank Head Office: पुणे पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचा वास्तुपूजन समारंभ संपन्न

एखाद्या चौकात गर्दी वाढणे, मिरवणुकीचा प्रवाह बदलणे किंवा एखाद्या ठिकाणी अचानक लोकांचा ओघ वाढणे, हे ड्रोनमधून वरून अधिक स्पष्ट दिसत होते. गॉगलमुळे हे दृश्य अधिकाऱ्यांना तत्काळ पाहता आले. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन संबंधित पथकाला सूचना देणे यामुळे सोपे झाले.

Police AI Goggles
Pune New Mutha Right Canal Encroachment: नवीन मुठा उजवा कालव्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई रखडली; मनुष्यबळाचा अभाव

ड्रोनचे लाइव्ह फीड पाहण्यासाठी मोबाईल काढणे, स्क्रीनकडे पाहणे आणि पुन्हा प्रत्यक्ष गर्दीकडे लक्ष देणे, हा वेळखाऊ प्रकार टळला. गॉगलच्या स्क्रीनवरच दृश्य उपलब्ध असल्याने हात मोकळे राहिले आणि प्रत्यक्ष बंदोबस्तावरील लक्ष कायम ठेवता आले. पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांच्‍या मार्गदर्शनात सहायक पोलिस आयुक्‍त विवेक पवार यांनी या तंत्रज्ञाचा वापर उपयोगात आणला.

Police AI Goggles
Pune Metro Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला पुणे मेट्रोच्या प्रवासीसंख्येत घट; उत्पन्नात मात्र १६.६६ लाखांची वाढ

एआय-बेस्ड गॉगलचा असा झाला उपयोग

  • ड्रोनचे लाइव्ह दृश्य थेट गॉगलवर दिसल्याने मोबाईलमध्ये वारंवार पाहण्याची गरज टळली.

  • जमिनीवरील परिस्थिती पाहता आली.

  • गर्दी कोणत्या दिशेने वाढते आहे, याचा वरून तत्काळ अंदाज घेता आला.

  • मिरवणुकीचा प्रवाह बदलल्यास संबंधित पथकाला जलद सूचना देणे शक्य झाले.

  • चौक, मार्ग किंवा गर्दीच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या लहान हालचालींवरही लक्ष ठेवता आले.

  • ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या गर्दीचे व्यापक चित्र एकाच वेळी मिळाले.

  • सीसीटीव्ही, ड्रोन आणि प्रत्यक्ष पोलिसांच्या निरीक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली.

  • गॉगलचा मुख्य उपयोग ड्रोनचे दृश्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.

  • आकाशातील नजर थेट अधिकाऱ्यांच्या डोळ्यांसमोर आणणारा हा प्रयोग विसर्जन बंदोबस्तातील महत्त्वाचा तंत्रज्ञानाधारित बदल ठरला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news