Pune Peoples Bank Head Office: पुणे पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचा वास्तुपूजन समारंभ संपन्न

अमृत महोत्सवी ७५व्या वर्षात नव्या वास्तूचे लोकार्पण; मागील आर्थिक वर्षात ३५७ कोटींची विक्रमी व्यवसायवाढ
Pune Peoples Bank Head Office
Pune Peoples Bank Head OfficePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: अमृत महोत्सवी 75 व्या वर्षात पदार्पण केलेल्या पुणे पीपल्स बँकेच्या तावरे कॉलनी, पर्वती, पुणे येथील स्वमालकीच्या देखण्या, अद्ययावत आणि सुविधासंपन्न मुख्य कार्यालयाचे वास्तुपूजन नुकतेच पार पडले. या समारंभाला महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या शुभहस्ते व बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक सदस्य विजयकांतजी कोठारी व पन्नालालजी लुणावत हे उपस्थित होते.

Pune Peoples Bank Head Office
Pune New Mutha Right Canal Encroachment: नवीन मुठा उजवा कालव्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई रखडली; मनुष्यबळाचा अभाव

याप्रसंगी संचालक मंडळ सभागृहाचेही उद्घाटन करण्यात आले. ग्राहकांचा विश्वास, आपुलकीची सेवा आणि थेट संपर्क ही सहकारी संस्था टिकण्याचे, वाढण्याचे आणि विकसीत होण्याचे मर्म व सत्य आहे आणि पुणे पीपल्स बँक याचे आदर्श उदाहरण आहे असे गौरवोद्गार माधुरी मिसाळ यांनी काढले.

Pune Peoples Bank Head Office
Pune Metro Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला पुणे मेट्रोच्या प्रवासीसंख्येत घट; उत्पन्नात मात्र १६.६६ लाखांची वाढ

आपल्या प्रास्ताविकात बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, गेल्या 75 वर्षात बँकेने अनेक चढ उतारावर मात करत लक्षणीय प्रगती केली. सभासद, ग्राहकांचा विश्वास, आपुलकी आणि प्रेम तसेच संचालक मंडळ व कर्मचा-यांचे अथक परिश्रम आणि निष्ठा यामुळे हे शक्य झाले आहे. परंतू स्वमालकीचे मुख्य कार्यालय ही एक खंत सर्वांच्या मनात सलत राहील होती, परंतू विश्वस्त भावनेने काम करणा-या संचालक मंडळाने १० वर्षापूर्वी आज वास्तुपूजन झालेली जागा खरेदी करण्याचा धाडसी निर्णय घेऊन अतिशय परिश्रमपूर्वक व नियोजनपूर्वक काम करुन या देखण्या वास्तूला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले.

Pune Peoples Bank Head Office
Maharashtra SIR Voter List: महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षणाला मुदतवाढ; दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी

बांधकाम क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञ म्हणून बँकेचे विद्यमान अध्यक्ष व आमचे सहकारी श्रीधर गायकवाड यांनी ही वास्तू परिपूर्ण, देखणी आणि प्रदर्शनीय करण्यात मोलाचे योगदान दिले आहे हे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते. आपले मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड साहेब म्हणाले की, संचालक मंडळाने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि केलेले सहकार्य व मार्गदर्शन यामुळे अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात बँकेच्या स्वमालकीचे देखणे, सुविधासंपन्न मुख्य कार्यालय सभासद, ग्राहकांसाठी अर्पण करण्यात मला विशेष आनंद व अभिमान वाटत आहे.

Pune Peoples Bank Head Office
Pune Ganesh Visarjan Theft: गणेश विसर्जनाच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; पुणे शहरात १३ गुन्हे दाखल

आपल्या सर्वांच्या बहुमोल योगदान, सहकार्य व मार्गदर्शनामुळे ही स्वप्नपूर्ती साकार झाली आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेने रु.३५७ कोटी इतकी विक्रमी व्यवसाय वाढ केली आहे हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. यासाठी मला माझ्या संचालक मंडळातील सहकारी आणि बँकेच्या सर्व सेवकांचे बहुमोल सहकार्य लाभले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार बँकेच्या संचालक मंडळ व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांचे शुभहस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन बँकेच्या संचालिका वैशालीताई छाजेड यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना निघोजकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news