Pune Metro Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला पुणे मेट्रोच्या प्रवासीसंख्येत घट; उत्पन्नात मात्र १६.६६ लाखांची वाढ

५.८० लाख प्रवाशांचा मेट्रोतून प्रवास; महात्मा फुले मंडई स्थानक ठरले सर्वाधिक गर्दीचे
Pune Metro
Pune Metro Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: अनंत चतुर्दशीच्या (विसर्जन मिरवणूक) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची (महामेट्रो) पुणे मेट्रो सेवा २४ तास अखंडित सुरू ठेवूनही प्रवासीसंख्येत सुमारे १० हजारांनी घट झाली. मात्र, तिजोरीत १६ लाख ६६ हजार रुपयांनी वाढ झाल्याची नोंद महामेट्रोने केली. यंदा दि. २५ सप्टेंबर सकाळी सहा ते २६ सप्टेंबर सकाळी सहा, या २४ तासांत ५ लाख ८० हजार ९४४ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यातून ८५ लाख ६१ हजार ८९५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ५ लाख ९० हजार २८० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला होता. त्या वेळी ६८ लाख ९५ हजार ६५७ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. म्हणजेच, यंदा प्रवासीसंख्या १० हजार ६६४ ने घटली, तर उत्पन्नात २४.१९ टक्क्यांची वाढ झाली.

Pune Metro
Maharashtra SIR Voter List: महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षणाला मुदतवाढ; दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी

दरम्यान, गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत पुणे मेट्रोला मात्र मोठा प्रतिसाद मिळाला. दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान तब्बल ४८ लाख ३२ हजार ९१५ प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला असून, ७ कोटी ४९ लाख २८ हजार ३७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत प्रवासीसंख्येत सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली. विसर्जनाच्या दिवशी महात्मा फुले मंडई स्थानक सर्वाधिक गर्दीचे ठरले. या स्थानकावर ७० हजार ३७५ प्रवाशांची नोंद झाली. त्यापाठोपाठ डेक्कन जिमखाना, स्वारगेट, पीसीएमसी आणि रामवाडी स्थानकांवर मोठी गर्दी झाली.

Pune Metro
Pune Ganesh Visarjan Theft: गणेश विसर्जनाच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ; पुणे शहरात १३ गुन्हे दाखल

गणेशोत्सवात वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची वारंवारता पाच मिनिटांवर आणण्यात आली होती. तसेच स्वारगेट, महात्मा फुले मंडई आणि डेक्कन जिमखाना स्थानकांवर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक दिवस जास्त असूनही महामेट्रोला अपेक्षित प्रवासीसंख्या आणि उत्पन्न वाढवता आले नसल्याचे सरासरीतून स्पष्ट होते.

गेल्या दोन वर्षांतील आढावा

  • तपशील - २०२५-२०२६

  • अनंत चतुर्दशीचे प्रवासी - ५,९०,२८० - ५,८०,९४४

  • प्रवासी फरक - १०,६६४ घट

  • एका दिवसाचे उत्पन्न - ६८.९६ लाख - ८५.६२ लाख

Pune Metro
El Nino February 2027: अल निनोचा फेब्रुवारीत कळस; यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र होण्याचा इशारा

कागदी तिकिटांकडे कल कायम

गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ७१ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब केला, तर २९ टक्के प्रवाशांनी कागदी तिकीट खरेदी केले. यामध्ये एकूण ८६ टक्के प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने (ऑनलाइन, यूपीआय पेमेंट) केले, तर १४ टक्के प्रवाशांनी रोख रकमेचा वापर केला, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.

सर्वाधिक प्रवास या मार्गावरून

  • महात्मा फुले मंडई - ७०,३७५

  • डेक्कन जिमखाना - ६४,९३८

  • स्वारगेट - ४८,९०६

  • पीसीएमसी - ४३,४९१

  • रामवाडी - ३७,८९४

  • पीएमसी - ३६,५८८

  • वनाज - ३०,६८६

  • नळ स्टॉप - ३०,५१९

  • गरवारे कॉलेज - २६,८३२

  • छत्रपती संभाजी महाराज उद्यान - २३,३५०

  • पुणे रेल्वे स्टेशन - २०,१४९

Pune Metro
Patas Road Work Controversy: पाटसच्या रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचा सवाल; सार्वजनिक निधी खासगी घरासाठी?

गेल्या वर्षीच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला प्रवासीसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. मात्र, यंदा १२ दिवस गणेशोत्सव असल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा ओघ दहा दिवसांत कायम होता. निश्चितच प्रवासीसंख्येत आणि उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. नागरिकांच्या सुलभ प्रवासाच्या दृष्टीने महामेट्रोचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.

श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news