

पुणे : मेट्रोचा पुण्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, त्यावरून धावणाऱ्या मेट्रो ट्रेनने प्रवास करणे पुणेकरांच्या चांगलेच अंगवळणी पडले आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील 31.6 किलोमीटर अंतराच्या व 9 हजार 897.19 कोटी खर्चाच्या दोन विस्तारित मार्गिकांना केंद्र सरकारने आज मान्यता दिली. या निर्णयाने शहराच्या चहूबाजूला मेट्रोचे जाळे विस्तारणार असून, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
स्वारगेट ते पिंपरी - (मार्ग 1) - 17.4 कि.मी. - 5 भुयारी, 9 एलिव्हेटेड स्टेशन
वनाज ते रामवाडी - (मार्ग 2) - 15.7 कि.मी. - 16 एलिव्हेटेड स्टेशन
पिंपरी ते निगडी (मार्ग 1 एक्सटेंशन अ) - 4.413 कि.मी. - 4 एलिव्हेटेड स्टेशन
स्वारगेट ते कात्रज (मार्ग 1 एक्सटेंशन बी) - 5.46 कि.मी. - 3 भुयारी स्टेशन
वनाज ते चांदणी चौक (1.12 कि.मी., 2 स्थानके)
रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (11.63 कि.मी., 11 स्थानके)
खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी (25.51 कि.मी., 22 स्थानके)
नळ स्टॉप ते वारजे-माणिकबाग (6.12 कि.मी., 6 स्थानके)
हडपसर ते लोणी काळभोर (11.35 कि.मी., 10 स्थानके)
हडपसर ते सासवड रस्ता (5.57 कि.मी., 4 स्थानके)
या नव्या मेट्रो मार्गामुळे पुणे शहराचे पूर्व, मध्यवर्ती आणि पश्चिम हे अत्यंत महत्त्वाचे भाग थेट जोडले जाणार आहेत. हा निर्णय पुणे शहराच्या कनेक्टिव्हिटीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. खराडी (पूर्व) पासून खडकवासला (पश्चिम) पर्यंत आणि नळ स्टॉप ते माणिक बागपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्याने शहरातील नागरिकांचा प्रवास जलद, सोपा आणि कार्यक्षम होईल. प्रवासासाठी लागणारा वेळ वाचेल आणि शहरातील विविध भागांना जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान अधिक सुलभ होण्यास मदत होईल.
श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक (आयएएस), महामेट्रो
खडकवासलाहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गात दळवीवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु. ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट स्थानक राहणार असून, पुढे हडपसरमार्गे खराडीला जाणार आहे. तसेच हडपसरवरून खराडीला जाताना मगरपट्टा साऊथ, मगरपट्टा मेन, मगरपट्टा नॉर्थ, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथनगर, खराडी चौक, अशी स्थानके असणार आहेत.
नळस्टॉपपासून निघाल्यावर कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलतनगर (सनसिटी) अशी मेट्रो स्थानके असतील. याच मार्गे माणिकबागेला जाता येणार आहे.
खराडी ते खडकवासला आता मेट्रोने जोडणार...
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारचा ग््राीन सिग्नल
पूर्व-मध्य-पश्चिम पुणे थेट जोडले जाणार
31 किमीचे नवीन मार्ग 5 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला (टप्पा-2) केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या ‘मार्गिका-4’ आणि ‘मार्गिका 4-अ’ या महत्त्वाकांक्षी मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांची वाढती वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार असून, पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
दरम्यान, या मेट्रो मार्गिकांमुळे पूर्व-मध्य आणि पश्चिम पुणे एकमेकांना जोडले जाणार आहे. त्यामुळे खराडी भागातून थेट हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासलापर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. तसेच कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतूनही पुणेकरांना सिंहगड रोडला माणिक बाग येथे मार्गिका 4-अ मुळे जाणे शक्य होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास वेगवान होणार असून, वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होणार आहे.
तीन वर्षांच्या कालावधीत सहा कोटींहून अधिक प्रवाशांना दिली सेवा 95 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न
दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी करतात वापर
रोजचे उत्पन्न 15 लाख रुपयांवर
एकूण अपेक्षित खर्च : 9857.85 कोटी रुपये