PMC Land Fraud: महापालिकेची जमीन परस्पर विकून तब्बल अडीच कोटींचे कर्ज काढले! 'या' परिसरातील धक्कादायक प्रकार

९० वर्षांच्या भाडेतत्त्वावरील जमिनीवर नातेवाइकांनीच केली फसवणूक; गुन्हा दाखल करण्याची विधी विभागाची शिफारस
PMC Land Fraud
PMC Land FraudPudhari
Published on
Updated on

पुणे : महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीचे नातेवाइकांमधील व्यवहारातून परस्पर खरेदीखत करून एका बँकेकडून तब्बल अडीच कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

PMC Land Fraud
Public Treasury Politics: आयजीच्या जिवावर बायजी उदार..! जनतेच्या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांची गमजा

या प्रकरणात महापालिकेची फसवणूक झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष निघत असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस विधी विभागाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाला केली आहे. त्यामुळे महापालिकेकडून भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या इतर जमिनींची सद्य:स्थिती काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

PMC Land Fraud
Leopard Attack Nimgaon: मृत्यूच्या दाढेतून आईने मुलाला ओढून काढले — बिबट्याचा थरार

लहुजी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल हातागळे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकाराचा पर्दाफाश केला. महात्मा फुले-घोरपडी पेठ येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली चार गुंठे जमीन महापालिकेने पूरग््रास्तांच्या पुनर्वसनासाठी 90 वर्षांकरिता भाडेतत्त्वावर दिली होती.

PMC Land Fraud
International Theatre Festival Kerala: केरळच्या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवामध्ये पुण्याची 3 नाटके

मात्र, संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी बनावट दस्तऐवज तयार करून जमिनीचे हक्क आईच्या नावावर घेतले आणि नंतर त्या जागेवर तब्बल अडीच कोटी रुपयांचे कर्ज काढले. या अनधिकृत हस्तांतराबाबत मूळ भाडेकरूने थेट महापालिका व पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करून महापालिका आयुक्तांना अहवाल पाठविला.

PMC Land Fraud
Police Suspension: ‘मी सीपींनाही भीत नाही’ म्हणत पोलिस कर्मचाऱ्याची अरेरावी

अहवालात फसवणुकीचे संकेत स्पष्ट असल्याचे नमूद करून पुढील कारवाईची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने विधी शाखेकडून अभिप्राय मागविल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली. त्यानुसार पुढील पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत ठोंबरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news