Pune Market Rates: पुण्यात साखर, गूळ महागले; ज्वारी, बाजरीच्या दरातही तेजी

साखरेच्या दरात किलोमागे ५ रुपये, गुळात २ ते ३ रुपयांची वाढ; गोटा खोबरे क्विंटलमागे ४००० रुपयांनी महागले
Sugar
Sugar Pudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: नवरात्रोत्सव, दसरा आणि आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखर व गुळाला मागणी वाढल्याने घाऊक बाजारात दरवाढ झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात साखरेच्या दरात किलोमागे ५ रुपये, तर गुळाच्या दरात २ ते ३ रुपयांनी वाढ झाली.

Sugar
Pune Fish Market Rates: पुण्यात पापलेट, रावस महागले; मटण, चिकनचे दर स्थिर

त्याचबरोबर पावसातील खंड आणि उत्पादनावरील परिणामामुळे ज्वारी, बाजरी आणि गव्हाच्या दरातही तेजी आली आहे. आठवडाभरात ज्वारी किलोमागे ४ ते ५ रुपये, बाजरी ३ रुपये, तर गहू १ रुपयाने महागला आहे. मागणी वाढल्याने कोलम तांदळाच्या दरात किलोमागे २ रुपयांची वाढ झाली असून, अन्य तांदळाचे दर स्थिर आहेत.

Sugar
Pune Railway Station Diwali Arrangements: दिवाळी, छठपूजेसाठी पुणे रेल्वेस्थानकावर विशेष व्यवस्था; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी स्वतंत्र मंडप

पश्चिम बंगालमधून मागणी वाढल्याने गोटा खोबऱ्याच्या दरात किलोमागे तब्बल ४० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. दुसरीकडे नवरात्रोत्सवाची सांगता जवळ आल्याने साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्याची मागणी तुलनेने मंदावली आहे.

Sugar
Pune Sewage Management Failure: पुण्यात सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा! चार वर्षांत ४० कोटी खर्च, तरी नाल्यांत मैलामिश्रित पाणी

मात्र, त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मागणी आणि पुरवठ्यात समतोल असल्याने खाद्यतेल, डाळी, कडधान्ये, आटा, मैदा, पोहे, लाल मिरची आणि नारळाचे दरही मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Sugar
Pune Illegal Construction Penalty Recovery: पुण्यात अनधिकृत बांधकामे पाडण्याचा खर्च आता बांधकामधारकांकडून वसूल होणार; पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा

घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे:

साखर (प्रतिक्विंटल) : ५,३५० ते ५,४५० रुपये. गूळ (प्रतिक्विंटल) : गूळ नं. १ : ५,३५० ते ५,५००, गूळ नं. २ : ५,२०० ते ५,३००, गूळ नं. ३ : ५,००० ते ५,१५०, बॉक्स गूळ : ५,५०० ते ७,२०० रुपये. ज्वारी (प्रतिक्विंटल) : गावरान नं. १ : ८,००० ते ८,५००, गावरान नं. २ : ७,२०० ते ७,८००, गावरान नं. ३ : ६,००० ते ६,६००, दुरी नं. १ : ४,८०० ते ५,०००, दुरी नं. २ : ४,२०० ते ४,५०० रुपये. बाजरी (प्रतिक्विंटल) : महिको नं. १ : ३,६०० ते ३,९००, महिको नं. २ : ३,४०० ते ३,६००, गावरान : ३,२५० ते ३,४००, हायब्रीड : ३,०५० ते ३,१५० रुपये. गहू (प्रतिक्विंटल) : लोकवन नं. १ : ४,५०० ते ४,८००, लोकवन नं. २ : ४,१०० ते ४,३००, लोकवन नं. ३ : ३,५०० ते ३,८००, सिहोर नं. १ : ६,५०० ते ७,०००, सिहोरी : ३,९०० ते ४,६००, मिलबर : ३,२०० ते ३,३०० रुपये. कोलम तांदूळ (प्रतिक्विंटल) : एचएमटी कोलम : ७,२०० ते ७,७००, लचकारी कोलम : ८,००० ते ८,४०० रुपये. गोटा खोबरे (प्रतिक्विंटल) : ३४,००० ते ३८,००० रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news