Pune Railway Station Diwali Arrangements: दिवाळी, छठपूजेसाठी पुणे रेल्वेस्थानकावर विशेष व्यवस्था; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी स्वतंत्र मंडप

पार्सल विभागाशेजारी प्रवाशांसाठी मंडप; पिण्याचे पाणी, पंखे, प्रसाधनगृहांसह अतिरिक्त कर्मचारी आणि आरपीएफ बंदोबस्त
Pune Railway Station Diwali Arrangements
Pune Railway Station Diwali ArrangementsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळी व छठपूजा सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वेस्थानकांवर होणारी अलोट गर्दी आणि त्यामुळे उद्भवणारी चेंगरा-चेंगरीची शक्यता टळावी, यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांसाठी एक स्वतंत्र मंडप उभारला आहे, यात पायाभूत सुविधा, गाड्यांची माहिती देणारे फलक, अतिरिक्त कर्मचारी आणि कडक रेल्वे पोलिस (आरपीएफ) बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

Pune Railway Station Diwali Arrangements
Pune Sewage Management Failure: पुण्यात सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा! चार वर्षांत ४० कोटी खर्च, तरी नाल्यांत मैलामिश्रित पाणी

पुणे रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरील वाढता ताण कमी करण्यासाठी यंदा रेल्वेस्थानक परिसरात (पार्सल विभागशेजारी) प्रवाशांसाठी एक स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. मागील काही वर्षापूर्वी पुणे रेल्वेस्थानकावर चेंगरा-चेंगरीची घटना घडली होती. अशी घटना होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाकडून हे नियोजन करण्यात आले आहे.

Pune Railway Station Diwali Arrangements
Pune Illegal Construction Penalty Recovery: पुण्यात अनधिकृत बांधकामे पाडण्याचा खर्च आता बांधकामधारकांकडून वसूल होणार; पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा

पुणे रेल्वेस्थानकावर स्वतंत्र नोडल अधिकारी आणि अतिरिक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसह अतिरिक्त रेल्वे पोलिस (आरपीएफ) प्रवाशांच्या सेवेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. या मंडपात पुरेशा प्रमाणात लाइट आणि फॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, अतिरिक्त सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांच्या आगमनाची आणि प्रस्थानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी माहिती दर्शक फलक लावण्यात आले आहेत.

Pune Railway Station Diwali Arrangements
Pune Cantonment Building Bylaws 2026: पुणे कॅन्टोन्मेंटच्या बांधकाम नियमांत बदल; तीन झोननुसार एफएसआय आणि उंचीची मर्यादा प्रस्तावित

याशिवाय पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली असून, प्रवाशांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी विशेष प्रसाधनगृहांची व्यवस्था या मंडपात करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेता, प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर एकदम गर्दी न करता या स्वतंत्र मंडपाचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Pune Railway Station Diwali Arrangements
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील; ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

प्रवाशांची सुरक्षा, सोय आणि प्लॅटफॉर्मवरील चेंगरा-चेंगरी टळावी, यासाठी पुणे रेल्वे विभागाने यंदा हे नियोजन केले आहे. मुख्य प्लॅटफॉर्मवरील ताण कमी करण्यासाठी आम्ही पुणे स्थानक परिसरातच पार्सल विभागाशेजारी एका स्वतंत्र मंडपाची विशेष व्यवस्था उभी केली आहे. या मंडपात प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी लाइट, फॅन, पिण्याचे शुद्ध पाणी आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दिवाळी विशेष ट्रेनच्या वेळांची अचूक माहिती मिळण्यासाठी माहिती दर्शक फलक आणि मार्गदर्शनासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे.

हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news