Pune Fish Market Rates: पुण्यात पापलेट, रावस महागले; मटण, चिकनचे दर स्थिर

आवक घटल्याने पापलेट आणि रावसच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ; मटण, चिकन आणि अंड्यांचे दर कायम
Fish
Fish Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: नवरात्रोत्सव सुरू असल्याने बाजारातील मागणीनुसार व्यापाऱ्यांकडून मासळी मागविण्यात येत आहे. मागणीच्या तुलनेत पापलेट आणि रावसची आवक कमी पडल्याने त्याच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.

Fish
Pune Railway Station Diwali Arrangements: दिवाळी, छठपूजेसाठी पुणे रेल्वेस्थानकावर विशेष व्यवस्था; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी स्वतंत्र मंडप

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १५००-१८००, मध्यम : १२००-१५००, लहान : ८००-९००, भिला : ५००-७००, हलवा : ६००-७००, सुरमई ५००-७००, रावस : ८००-९००, घोळ : ६००-८००, करली : ३००-४००, भिंग : ४००-५००, पाला : लहान : ६००-७०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ६००-८००, काळी : ३००-४००, ओले बोंबील : १००-२००.

Fish
Pune Sewage Management Failure: पुण्यात सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा! चार वर्षांत ४० कोटी खर्च, तरी नाल्यांत मैलामिश्रित पाणी

कोळंबी : लहान : १५०-२४०, मध्यम : ३५०-४८०, मोठी : ६००-८००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : २०००-२२००, मोरी : १५०-२००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : ३००-३५०, चिंबोर्‍या : ६००-८००.

Fish
Pune Illegal Construction Penalty Recovery: पुण्यात अनधिकृत बांधकामे पाडण्याचा खर्च आता बांधकामधारकांकडून वसूल होणार; पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा

नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४००, शिवडा : १८०-२००, खवली : १८०-२००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : २५०-३००, वाम : ४००-४५०. मटण : ८४०, कलेजी ८८०. चिकन २५०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १७०, बोनलेस ३५०. अंडी : गावरान (शेकडा) १२१० डझन १५६, प्रतिनग १३. इंग्लिश (शेकडा) ६००, डझन ८४, प्रतिनग ७.००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news