Pune Sewage Management Failure: पुण्यात सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा! चार वर्षांत ४० कोटी खर्च, तरी नाल्यांत मैलामिश्रित पाणी

भैरोबा, नागझरी आणि आंबील ओढ्यात सांडपाण्याचा प्रवाह कायम; यंदा पुन्हा साडेआठ कोटींच्या खर्चाचे नियोजन, कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
Sewage Management Failure
Sewage Management FailurePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील सांडपाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मलवाहिन्यांचे जाळे उभारले, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारले आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या. मात्र, या सगळ्या यंत्रणेच्या अस्तित्वानंतरही भैरोबा, नागझरी आणि आंबील ओढ्यासारख्या नाल्यांतून सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.

Sewage Management Failure
Pune Illegal Construction Penalty Recovery: पुण्यात अनधिकृत बांधकामे पाडण्याचा खर्च आता बांधकामधारकांकडून वसूल होणार; पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा

मागील चार वर्षांत ट्रंक लाइनच्या स्वच्छता आणि दुरुस्ती साठी तब्बल ४० कोटी रुपये खर्च झाले. तरीही सांडपाण्याची गळती आणि नाल्यांतील प्रदूषण कायम असल्याने या पैशांचा चुराडा झाला आहे. यावर्षी पुन्हा सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याने कामांच्या दर्जावर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरात दररोज किमान १,६०० एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातून सुमारे ८०० एमएलडी सांडपाणी निर्माण होते. सध्या शहरातील नऊ एसटीपींची एकत्रित प्रक्रिया क्षमता ४७७ एमएलडी आहे. जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता वाढणार आहे.

Sewage Management Failure
Pune Cantonment Building Bylaws 2026: पुणे कॅन्टोन्मेंटच्या बांधकाम नियमांत बदल; तीन झोननुसार एफएसआय आणि उंचीची मर्यादा प्रस्तावित

मात्र, उपलब्ध सांडपाणी योग्य पद्धतीने संकलित करून शुद्धीकरण प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्यातच अडथळे असतील, तर प्रकल्पांची क्षमता वाढवूनही अपेक्षित परिणाम कसा साधणार, हा प्रश्न आहे. शहरात घरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी १५० ते ३०० मि.मी. व्यासाच्या छोट्या वाहिन्यांद्वारे संकलित केले जाते. त्यानंतर ते ३०० ते ६०० मि.मी. व्यासाच्या मुख्य मलवाहिन्यांमध्ये सोडले जाते. पुढे मोठ्या व्यासाच्या, १,६०० मि.मी.च्या ट्रंक लाइनद्वारे हे पाणी एसटीपीपर्यंत पोहोचवतात. प्रक्रिया केलेले पाणीच नदीत सोडणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीत २,२०० किमी लांबीचे मलवाहिन्यांचे जाळे आहे. एवढी मोठी यंत्रणा अस्तित्वात असताना शहरातील सांडपाणी थेट नाल्यांमध्ये कसे पोहोचते, याचा शोध घेण्याची गरज आहे. वाहिन्यांमधील गळती, अडथळे, अपुरी देखभाल किंवा जोडण्यांमधील त्रुटी यांपैकी नेमकी कारणे कोणती, याबाबत स्पष्ट चित्र समोर येणे आवश्यक आहे.

Sewage Management Failure
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील; ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

नाल्यांतील प्रवाह थांबविण्यात अपयश

भैरोबा नाला, नागझरी नाला आणि आंबील ओढा या परिसरांतील सांडपाणी मलवाहिन्यांद्वारे एसटीपीकडे वळविणे अपेक्षित आहे. मात्र, या नाल्यांतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहताना दिसते. सकाळी आणि सायंकाळी पाण्याचा वापर वाढल्यानंतर मलवाहिन्यांमधून सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता आणि संकलन व्यवस्थेची कार्यक्षमता अधिक महत्त्वाची ठरते. महापालिकेने विविध भागांत मलवाहिन्या टाकण्यासाठी मोठा खर्च केला आहे. तसेच, क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर स्वच्छता आणि देखभालीसाठी स्वतंत्र निविदा काढल्या जातात. तरीही नाल्यांमध्ये सांडपाण्याचा प्रवाह कायम असल्याने या कामांचे प्रत्यक्ष परिणाम तपासण्याची आवश्यकता आहे.

Sewage Management Failure
Pune FDA Action On Reliance Retail And Blinkit: पुण्यात रिलायन्स रिटेल आणि ब्लिंकिटला एफडीएचा दणका; दोन गोदामांचे परवाने निलंबित

चार वर्षांत ४० कोटी; यंदा पुन्हा साडेआठ कोटी

एसटीपीला जोडणाऱ्या ट्रंक लाइनच्या स्वच्छता आणि दुरुस्तीसाठी गेल्या चार वर्षांत ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, सांडपाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेतील त्रुटी दूर झाल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे या खर्चातून नेमकी किती कामे झाली, किती वाहिन्यांची स्वच्छता करण्यात आली आणि दुरुस्तीनंतर गळतीचे प्रमाण किती कमी झाले, याचा हिशेब तपासण्याची मागणी होत आहे. यंदाही या कामांसाठी सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्च होणार आहेत. मागील कामांचा आढावा, प्रत्यक्ष पाहणी आणि दर्जाची पडताळणी करूनच नव्या कामांना गती देणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news