Pune Graduate Election Smita Jadhav: पुणे पदवीधर निवडणूक: डॉ. स्मिताताई जाधव यांना अभिनव शिक्षण संस्थेचा पाठिंबा

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाठिंबा; पदवीधरांसाठीच्या नऊ कलमी संकल्पनाम्याचे केले कौतुक
Pune Graduate Election
Pune Graduate ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे पदवीधर निवडणूक मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांना प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील विविध शैक्षणिक संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. अभिनव शिक्षण संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी डॉ. स्मिताताई जाधव प्रचंड बहुमतांनी निवडून येण्यासाठी मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले.

Pune Graduate Election
Pune Mahalaxmi Temple Gold Saree: १६ किलो सोन्याची साडी, दोन किलोच्या मुकुटात महालक्ष्मीचे दर्शन; पुणेकरांची गर्दी

या वेळी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप, संस्थेचे सहसचिव निर्मोही जगताप, प्राचार्य वर्षा शर्मा तसेच प्राचार्य सुनीता जाधव, ॲड. दिलीप जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे युवराज वरपे, समन्वयक सविता शिंदे, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिक्षकवृंद उपस्थित होते.

Pune Graduate Election
Pune Private Hospital Rates: खासगी रुग्णालयांचे दरपत्रक आता मराठी-इंग्रजीत लावावे लागणार; पुणे महापालिकेची अचानक तपासणी

डॉ. स्मिताताई जाधव यांनी पदवीधरांसाठी मांडलेले रोजगाराच्या संधी, सशुल्क इंटर्नशिप, आधुनिक तंत्रज्ञानातील प्रशिक्षण, महिलांसाठी घरून काम करण्याच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आणि स्वतंत्र पदवीधर पोर्टल यासारखे प्रस्ताव महत्त्वपूर्ण आहेत.

Pune Graduate Election
Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; प्रशासनाचा निर्णय

तसेच विद्यार्थ्यांपासून ते महिलांपर्यंत प्रत्येक घटकाचा विचार करून तयार केलेला संकल्पनामा यामुळे पदवीधरांमध्ये डॉ. स्मिताताई जाधव यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.

Pune Graduate Election
Pune University Exam Postponed: पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! २३ ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

राजकारणाची पाटी कोरी असलेल्या उच्चविद्याविभूषीत आणि शिक्षणक्षेत्रात गेल्या १५ ते २० वर्षांपासून काम करत असल्यामुळे शिक्षणक्षेत्रातील विविध समस्यांची असलेली जाण तसेच भविष्यात देखील शिक्षणक्षेत्रात नावीण्यपूर्ण काम करण्यासाठी आखलेला नऊ कलमी संकल्पनामा यामुळे डॉ. स्मिताताई जाधव यांनाच आम्ही मतदान करणार असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले, तर ॲड. दिलीप जगताप यांनी देखील डॉ. स्मिताताई जाधव यांनाच बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करत उपस्थितांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news