Pune University Exam Postponed: पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! २३ ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा नियोजनात बदल; सुधारित वेळापत्रक स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर होणार
SPPU
SPPUPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २३ ऑक्टोबरला नियोजित असलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले असून, या दिवशी होणाऱ्या परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्र परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

SPPU
MHT CET 2027 Exam Dates: MHT CET 2027 च्या तारखांबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई; यूट्यूब चॅनेलला कायदेशीर नोटीस

निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध शासकीय यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यापीठाने परीक्षा नियोजनात बदल केला आहे. मतदानाच्या दिवशी परीक्षा आयोजित केल्यास विद्यार्थी, शिक्षक आणि परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्या दिवशी नियोजित असलेल्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

SPPU
Pune FDA Paneer Khoya Seizure: पुण्यात ३१ लाखांचा भेसळीचा संशय असलेला पनीर-खवा जप्त करून नष्ट; एफडीएची मोठी कारवाई

विद्यापीठाच्या परिपत्रकात २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करून त्याऐवजी सुधारित तारखांना घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक स्वतंत्र परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र तलवारे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news