Pune Book Festival: पुणे पुस्तक महोत्सवात 50 कोटींहून अधिक उलाढाल; साडेबारा लाख नागरिकांची विक्रमी उपस्थिती

30 लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री; 60 टक्के तरुण वाचकांचा सहभाग, वाचन संस्कृतीला नवे बळ
Pune Book Festival
Pune Book FestivalPudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवात साडेबारा लाख नागरिकांनी भेट देत सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली असून यामाध्यमातून ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि पुस्तक खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Pune Book Festival
Flat Burglary: कात्रज, मांजरी भागातील सदनिकांवर चोरट्यांचा डल्ला; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

या महोत्सवात ६० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांचा सहभाग होता. त्यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी ठरला असून, आता हा महाराष्ट्राचा महोत्सव झाला आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Pune Book Festival
Pimpri Chinchwad politics: पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय उलथापालथ; राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या वाटेवर, अजित पवार नाराज

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२५ ची सांगता रविवारी झाली. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव संयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पांडे यांनी माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. आनंद काटीकर आदी उपस्थित होते.

Pune Book Festival
Police Firing Incident: पोलिसांवर गोळीबार; सराइत गुन्हेगाराविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवात एकूण साडेबारा लाख नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये तरुण - तरुणींची आणि शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे वाचन चळवळ सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे पुस्तक महोत्सवाचा प्रवास सुरू आहे. मोबाईल आणि गॅजेट्सच्या दुनियेतून बाहेर पडून नागरिक आणि तरुण पुस्तकांमध्ये रमल्याचे सकारात्मक चित्र येथे पाहायला मिळाले. लेखकांशी संवाद साधण्यासाठी आणि स्वाक्षरी घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा ही पुण्याच्या जागृत वाचन संस्कृतीची पावती आहे.

Pune Book Festival
Maharashtra PPP Health Project: राज्यात सरकारी रुग्णालयांत पीपीपी तत्त्वावर आरोग्य प्रकल्पांना हिरवा कंदील

गेल्यावर्षी साधारण २५ लाख पुस्तकांची खरेदी नागरिकांनी केली होती. यातून सुमारे ४४ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. यंदा दोन्ही प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केल्याने सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. पुस्तक खरेदी करणाऱ्यांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. पुणे पुस्तक महोत्सवात यंदा एकूण तीन विश्वविक्रम करण्यात आले. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली.

Pune Book Festival
BJP municipal election success Maharashtra: नगरपालिका निकाल म्हणजे मोदी-फडणवीस डबल इंजिन सरकारवरील विश्वास : मुरलीधर मोहोळ

पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव १२ ते २० डिसेंबर दरम्यान

पुढच्या वर्षी पुणे पुस्तक महोत्सव १२ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. आगामी महोत्सव अधिक चांगला आणि भव्य होण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. आवश्यक त्यावेळी योग्य माहिती देण्यात येईल असे देखील राजेश पांडे यांनी स्पष्ट केले.

Pune Book Festival
Ajit Pawar Nagar Parishad Election Reaction: नगरपरिषद निकाल म्हणजे महायुती सरकारच्या कामाची पावती : अजित पवार

पुणे पुस्तक महोत्सव दृष्टीक्षेपात

- ४०० शाळांमधील ३० हजारहून अधिक विद्यार्थी 'चिल्ड्रन्स कॉर्नर'मध्ये सहभागी झाले.

- महोत्सवात आलेल्या नागरिकांपैकी ६० टक्क्यांहून अधिक तरुण वाचक दिसले.

- महोत्सवातर्फे एक लाख तरुणांना दिलेल्या कूपन्सद्वारे १ कोटी १० लाखांहून अधिक किमतीची पुस्तके खरेदी करण्यात आली.

- दोनशेहून अधिक सार्वजनिक, शाळा, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ ग्रंथालयांनी येथून लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली.

- महोत्सवात विक्रमी ४९८ पुस्तकांचे प्रकाशन झाले.

- बाराशेहून अधिक लेखक, साहित्यिक व कवी विविध व्यासपीठावर सहभागी झाले. याशिवाय वाचकांचे संमेलनही झाले.

- ज्ञान सोहळा असलेल्या 'पुणे लिट फेस्ट'मध्ये १२२ नामवंत वक्त्यांनी पुणेकरांशी संवाद साधला

- १५० पेक्षा अधिक दालनांवर पुस्तक प्रकाशन झाले

Pune Book Festival
Shirur Nagar Parishad Election Result: शिरूर नगरपरिषद नगराध्यक्षपदी ऐश्वर्या पाचर्णे विजयी

पुणे हे पुस्तकांच्या खरेदीची बाजारपेठ झाली आहे. राज्यभरातून अनेक नागरिक पुस्तक खरेदीसाठी आले होते. हा संयोजकांचा नाही तर, नागरिकांचा पुस्तक महोत्सव झाला आहे. महोत्सवात सर्व भाषिक पुस्तकांची दालने असल्याने, सर्व भाषिक नागरिकांची संख्या होती. यंदा अनेकजण सहकुटुंब आले, ही फार सकारात्मक बाब आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, पुणे लिट फेस्टिव्हल आणि चिल्ड्रेन कॉर्नर अशा तिन्ही ठिकाणचा उत्साह कमालीचा होता. पुणे पुस्तक महोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राचा महोत्सव झाला आहे. यासाठी सर्व पुणेकरांचे मनापासून आभारी आहोत. आगामी पुणे पुस्तक महोत्सव आणखी भव्य आणि नावीन्यपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत

राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news