Police Firing Incident: पोलिसांवर गोळीबार; सराइत गुन्हेगाराविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

वाघोली परिसरात थरारक घटना; प्रत्युत्तरादाखल पोलिसांच्या गोळीबारात आरोपी जखमी
Gun Firing Pune
Gun Firing PunePudhari
Published on
Updated on

पुणे : पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराइताविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ओंकार दिलीप भंडारी (वय २६, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.

Gun Firing Pune
Maharashtra PPP Health Project: राज्यात सरकारी रुग्णालयांत पीपीपी तत्त्वावर आरोग्य प्रकल्पांना हिरवा कंदील

नगर रस्ता भागात ही घटना घडली होती. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गाेळीबारात सराइत जखमी झाला होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Gun Firing Pune
BJP municipal election success Maharashtra: नगरपालिका निकाल म्हणजे मोदी-फडणवीस डबल इंजिन सरकारवरील विश्वास : मुरलीधर मोहोळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी सराइत गुन्हेगार असून, वाहन तोडफोडीचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तो पसार झाला होता. चंदननगर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. शनिवारी सायंकाळी तो आव्हाळवाडी भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी तेथे रवाना झाले.

Gun Firing Pune
Ajit Pawar Nagar Parishad Election Reaction: नगरपरिषद निकाल म्हणजे महायुती सरकारच्या कामाची पावती : अजित पवार

पोलिसांनी सापळा लावला. तेव्हा भंडारी एका झुडपात लपला होता. त्याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. पोलस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेली गोळी भंडारीच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Gun Firing Pune
Shirur Nagar Parishad Election Result: शिरूर नगरपरिषद नगराध्यक्षपदी ऐश्वर्या पाचर्णे विजयी

पोलिसांवर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भंडारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news