Pimpri Chinchwad politics: पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय उलथापालथ; राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या वाटेवर, अजित पवार नाराज

पुण्यातील अजित पवार गटाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ajit pawar
ajit pawar pudhari photo
Published on
Updated on

Pimpri Chinchwad politics Ajit Pawar: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या पक्षांतरामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली असून, भाजपनेते गिरीश महाजन यांनी त्यावर अत्यंत मिश्किल भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

ajit pawar
Municipal Council Election Result 2025: कराडात राजेंद्रच‌‘सिंह‌’; पावसकरांचा दारुण पराभव

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील अजित पवार गटाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "आम्ही मित्रपक्ष म्हणून एकमेकांचे उमेदवार किंवा पदाधिकारी आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत, असे ठरवले होते. तरीही आमच्या पक्षातले लोक घेतले गेले आहेत. पक्षातले लोक दुसऱ्या बाजूला गेल्यावर नाराज होणारच. या विषयावर मी मुंबईत गेल्यावर सविस्तर चर्चा करेन."

ajit pawar
Ajit Pawar Nagar Parishad Election Reaction: नगरपरिषद निकाल म्हणजे महायुती सरकारच्या कामाची पावती : अजित पवार

गिरीश महाजनांची टोलेबाजी

अजित पवारांच्या या नाराजीवर गिरीश महाजन यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले की, "एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन! सध्या नुसत्या प्रेमात आणि युद्धातच नाही, तर निवडणुकीतही सगळं काही माफ असतं. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं आणि आम्ही आमच्या पद्धतीने."

ajit pawar
Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे हे भाजपसाठी ‘अपशकुन’! काय म्हणाले महाजन

महाजन पुढे म्हणाले की, "महायुतीमध्ये एक ठरलं होतं की मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे, आमचे किंवा पवारांचे प्रमुख कार्यकर्ते एकमेकांनी घेऊ नयेत. पण जर कोणीतरी सुरुवात केली आणि एक घेतला, की मग समोरून दोन घेतले जातात आणि तिकडून तीन! मला वाटतं हे योग्य नाही, पण शेवटी निवडणुकीत या गोष्टी घडतच असतात."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news