

शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ऐश्वर्या अभिजित पाचर्णे 1925 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 8799 मते पडली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अलका सुरेश खांडरे यांना 6874, भारतीय जनता पार्टीच्या सुवर्णा राजेंद्र लोळगे यांना 6742 मते पडली तर शिवसेना शिंदे गटाच्या रोहिणी किरण बनकर यांना 390 मते पडली. अपक्ष उमेदवार वैशाली दादाभाऊ वाखारे यांना 481 मते पडली. नगरसेवकपदाच्या 24 पैकी 11 जागा जिंकत भाजपाने मुसंडी मारली. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने सात तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाच जागा जिंकल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडूण आला.
शिरूर नगरपरिषदेच्या नगरसेवकपदाच्या 24 जागांसाठी 12 प्रभागांत एकूण 99 उमेदवार रिंगणात होते. नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रथमच सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांसह महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग््रेास पक्ष होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (शिंदे गट) यांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी स्वतःची वेगळी प्रचार यंत्रणा उभी केली होती. त्याचा फायदा त्यांना मिळाला. आयेशा कलीम सय्यद या अपक्ष उमेदवार नगरसेवकपदी निवडूण आल्या.
नगरपरिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी झाली. मतमोजणी रविवारी (दि. 21) सकाळी दहा वाजता सुरू झाली. निकालाबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. 12 टेबलवर मतमोजणी करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अभिजित जगताप यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रितम पाटील यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
पक्षनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गट : संगीता महेंद्र मल्लाव (734), नीलेश गाडेकर (810), एजाज बागवान (1195), सुनील जाधव (1095), दिनेशकुमार मांडगे (796), सविता राजापुरे (791), स्वाती साठे (610).
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष : डॉ. सुनीता पोटे (925), स्वप्नाली जामदार (1252), चारुशीला कोळपकर (716), मितेश गादिया (947), रवी ढोबळे (901).
भारतीय जनता पार्टी : नितीन पाचर्णे (1019), सुनीता भुजबळ (1455), संतोष थेऊरकर (1571), सुनीता कुरुंदळे (984), सागर नरवडे (908), पूजा पोटावळे (887), नीलेश पवार (617), स्विटी शिंदे (878), अमित कर्डिले (1218), उमेश शेळके (557), रिंकू जगताप (602). अपक्ष - आयेशा कलीम सय्यद (762).