Paint Raw Material Price Rise: युद्धाचा फटका रंगउद्योगाला; कच्च्या मालाच्या किमतीत १०० टक्क्यांहून अधिक वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढ आणि पुरवठा साखळी विस्कळीत; लघु व मध्यम पेंट उद्योग अस्तित्वाच्या संकटात
Paint
PaintPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका इतर अनेक उद्योगांसह देशातर्गंत रंगउद्योगालाही बसला आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि विनिमय दरातील घसरणीमुळे देशांतर्गत लघु व मध्यम पेंट उद्योगाची पुरवठा साखळी विस्कळीत होऊन अवघ्या दोन महिन्यांत कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Paint
Pune Crime: पुण्यात वारजे लॉजवर छापा; अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका, महिला एजंटला अटक

रंगनिर्मिती उद्योग हा मर्यादित भांडवलावर चालणारा उद्योग आहे. या उद्योगासाठी लागणारा पेट्रोकेमिकल आधारित कच्चा माल पूर्णतः आयातीवर अवलंबून आहे. मात्र, युद्धामुळे या उद्‌योगाचे अस्तित्‍व धोक्यात आले आहे.

Paint
Pune Contaminated Water Issue: पुण्यात 3 आठवड्यापासून पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जानेवारी-फेब्रुवारी २०२६ च्या तुलनेत एप्रिल २०२६ मध्ये ब्युटाईल ॲसिटेट सर्वाधिक ११६ टक्‍के, तर मिनरल टर्पेन्टाईनचे दर १११ टक्क्यांनी वाढले आहेत. ब्युटाईल सेलोसोल्व्ह ९४.१० टक्‍के, नॉर्मल ब्युटानॉल ८१.८० टक्‍के आणि ॲलिफॅटिक हार्डनरचे दर ८० टक्‍के वाढले आहेत. त्यातच वाहतूक खर्च ४० टक्‍के आणि पॅकेजिंग साहित्यात ३० टक्‍के वाढ झाली आहे.

Paint
Pune APMC User Charges Protest: पुणे बाजार समिती युजर चार्जेसविरोधातील आवक बंद आंदोलन स्थगित

अस्तित्‍वासाठी झगडताहेत ७० टक्के उद्योग

पूर्वी ३० ते ४५ दिवसांची सवलत देणारे पुरवठादार आता 'ॲडव्हान्स पेमेंट'ची मागणी करत आहेत, तर बाजारातील वितरक ६० ते ९० दिवसांची उधारी मागत आहेत. या दुहेरी कात्रीमुळे उत्पादकांची कार्यरत भांडवलाची गरज दुप्पट झाली आहे. सध्या ७० टक्‍क्यांपेक्षा अधिक उद्योग केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत असून, ३० टक्‍के कारखाने थेट तोट्यात आहेत, तर १० टक्‍के उद्योग कायमचे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

Paint
Pune ST Package Tour Buses: पुणे एसटीच्या पॅकेज टूर बससेवेला मोठा प्रतिसाद; मे २०२६ मध्ये १७ लाखांचे उत्पन्न

सध्या लघु व मध्यम पेंट उद्योगाला अस्तित्व टिकविण्याची कठीण वेळ आली आहे. रंग उद्योग व्यवसाला सावरणारे धोरण सरकारने आखणे गरजेचे आहे.

पंकज शाह, रंगतंत्रज्ञ तथा अध्यक्ष, पेंट आणि कोटिंग क्लस्टर असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news