Pune APMC User Charges Protest: पुणे बाजार समिती युजर चार्जेसविरोधातील आवक बंद आंदोलन स्थगित

मंत्रालयातील सकारात्मक चर्चेनंतर व्यापाऱ्यांचा निर्णय; युजर चार्जेसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचे शासनाचे आश्वासन
Pune APMC
Pune APMCPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या युजर चार्जेस आकारणीविरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी पुकारलेले आवक बंद आंदोलन अखेर स्थगित केले आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर युजर चार्जेसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत आणि संबंधित कायद्याचा पुनर्विचार करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती आणि दि पूना मर्चंट‌्स चेंबरने हा निर्णय घेतला आहे.

Pune APMC
Pune ST Package Tour Buses: पुणे एसटीच्या पॅकेज टूर बससेवेला मोठा प्रतिसाद; मे २०२६ मध्ये १७ लाखांचे उत्पन्न

यासंदर्भात मंगळवारी (दि. ९ जून) मंत्रालयात व्यापारी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने गत महिन्यात २२ मे रोजी युजर चार्जेस आकारणीबाबत काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ दि पूना मर्चंट‌्स चेंबरने आंदोलनाची हाक दिली होती.

Pune APMC
Khambgaon Land Dispute Violence: खामगावमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

याच अनुषंगाने राज्यातील व्यापाऱ्यांनी ५ जूनपासून शेतकऱ्यांकडून थेट येणारा माल वगळता भुसार बाजारातील नियमित, अनियमित आणि अनुषंगिक सर्व प्रकारच्या मालाची आवक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ४ जून रोजी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत झालेल्या संयुक्त बैठकीत व्यापारी संघटनांची बाजू सविस्तरपणे मांडण्यात आली.

Pune APMC
Shivswarajya Din: अश्वारुढ स्मारकासमोर उभारणार भगव्या स्वराज्यध्वजासह ५१ फुट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी

या बैठकीत युजर चार्जेसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत, तसेच संबंधित कायद्याचा पुनर्विचार करून तो रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री रावल यांनी दिल्याची माहिती चेंबरकडून देण्यात आली.

Pune APMC
Patas Group Clash: पाटसमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी, दगडफेक आणि हवेत चार फायर

युजर चार्जेससह इतर प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ९) मंत्रालयात व्यापारी प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती आणि दि पूना मर्चंट‌्स चेंबरने पुकारलेले आवक बंद आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजेंद्र बाठीया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट‌्स चेंबर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news