Pune ST Package Tour Buses: पुणे एसटीच्या पॅकेज टूर बससेवेला मोठा प्रतिसाद; मे २०२६ मध्ये १७ लाखांचे उत्पन्न

धार्मिक व पर्यटन स्थळांच्या ३२ फेऱ्यांतून ९४% लोड फॅक्टर; प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिरूर व स्वारगेट आगाराची आघाडी
St Bus
St BusPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटनाच्या निमित्ताने एसटी, पुणे विभागाने मे २०२६ मध्ये आयोजित केलेल्या विशेष पॅकेज टूर बससेवेला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. एसटीकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मे महिन्यात विभागातील विविध आगारांतून एकूण ३२ बस फेऱ्यांचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल १७ लाख १८ हजार २५६ रुपयांची भर पडली आहे.

St Bus
Khambgaon Land Dispute Violence: खामगावमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

धार्मिक स्थळांना प्रवाशांची पहिली पसंती...

एसटी प्रशासनाने आखलेल्या पॅकेज टूरमध्ये पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे आणि कोकण दर्शन या मार्गांना पर्यटकांनी व भाविकांनी सर्वाधिक पसंती दिली.

St Bus
Shivswarajya Din: अश्वारुढ स्मारकासमोर उभारणार भगव्या स्वराज्यध्वजासह ५१ फुट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी

२३ हजार कि.मी.चा प्रवास...

मे महिन्यात पुणे विभागातील शिवाजीनगर, स्वारगेट, भोर, नारायणगाव, राजगुरुनगर, शिरूर, सासवड, इंदापूर, पिंपरी-चिंचवड आणि एमआयडीसी या आगारांमधून विविध तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांसाठी पॅकेज टूर बस सोडण्यात आल्या होते. या ३२ बस फेऱ्यांनी एकूण २३,५९६.८ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण मोहिमेत प्रवाशांची संख्या उत्तम राहिल्याने सरासरी लोड फॅक्टर (भार गुणक) ९४ टक्के इतका नोंदवला गेला आहे, तर प्रतिकिलोमीटर सरासरी उत्पन्न (ईपीकेएम) ७२.८२ रुपये राहिले आहे.

St Bus
Patas Group Clash: पाटसमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी, दगडफेक आणि हवेत चार फायर

शिरूर अन्‌ स्वारगेट आगाराची आघाडी

  • शिरूर आगार : पॅकेज टूर नियोजनात शिरूर आगार आघाडीवर राहिले आहे. येथून अक्कलकोट, पंढरपूर आणि अहमदाबाद-सौंदती अशा सर्वाधिक ११ बस फेऱ्या सोडण्यात आल्या. या फेऱ्यांमधून सर्वाधिक ४ लाख ०२ हजार ७०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

  • स्वारगेट आगार : स्वारगेट येथून गाणगापूर, कोकण दर्शन आणि साडेतीन शक्तीपीठ या धार्मिक मार्गांवर ३ बसफेऱ्या चालवण्यात आल्या. या फेऱ्यांनी तब्बल २ लाख २० हजार ९४८ रुपयांची कमाई केली. येथील सरासरी लोड फॅक्टर १०१ टक्के इतका होता.

  • भोर आगार : भोर ते पंढरपूर मार्गावरील २ बस फेऱ्यांना प्रवाशांनी डोक्यावर घेतले. या मार्गावर सर्वाधिक १४१ टक्के लोड फॅक्टरची नोंद झाली असून, १ लाख ९१ हजार ८९३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

St Bus
Fake Revenue Documents Scam: बनावट आदेश करणाऱ्या टोळीचे पितळ उघडे

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये प्रवाशांना थेट आणि विनासायास पर्यटन व धार्मिक पर्यटन प्रवासाची पॅकेज टूरद्वारे सोय उपलब्ध करून दिल्यामुळे एसटीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादामुळे आगामी काळातही अशा पॅकेज टूरचे नियोजन करण्याचा मानस आहे.

कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news