Pune Crime: पुण्यात वारजे लॉजवर छापा; अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका, महिला एजंटला अटक

गुन्हे शाखेच्या AHTU कक्षाची कारवाई; कथित वेश्याव्यवसाय उघडकीस, पोलिसांचा पुढील तपास सुरू
prostitution racket crime case
prostitution racket crime casePudhari
Published on
Updated on

पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) धाड टाकून एका अल्पवयीन मुलीसह एका महिलेची सुटका केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी महिलांची व्यवस्था करणाऱ्या महिला एजंटला अटक करून तिच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

prostitution racket crime case
Pune Contaminated Water Issue: पुण्यात 3 आठवड्यापासून पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा; या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

याप्रकरणी आश्लेषा सचिन सोमणकर (वय ३४, रा. रूम नं. २, अंबिका निवास, हनुमान मंदिराजवळ, माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ, वारजे, पुणे, मूळ रा. १५, बी-१५, ख्रिसमस हाऊस, मोगल लेन, माहीम, मुंबई) हिच्यावर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

prostitution racket crime case
Pune APMC User Charges Protest: पुणे बाजार समिती युजर चार्जेसविरोधातील आवक बंद आंदोलन स्थगित

दि. ४ जून रोजी गुन्हे शाखेला वारजे येथील मुंबई-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या 'साई एक्झिक्युटिव्ह लॉजिंग अँड बोर्डिंग'मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनात पथकाने लॉजवर छापा टाकला.

prostitution racket crime case
Pune ST Package Tour Buses: पुणे एसटीच्या पॅकेज टूर बससेवेला मोठा प्रतिसाद; मे २०२६ मध्ये १७ लाखांचे उत्पन्न

आणि येथून एका अल्पवयीन मुलीची तसेच एका महिलेची सुटका करण्यात आली. त्यानंतर महिला एजंट आश्लेषा सोमणकरला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनात झाली.

prostitution racket crime case
Khambgaon Land Dispute Violence: खामगावमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्यासह पोलिस अंमलदार ईश्वर आंधळे, बबनराव केदार, दत्ताराम जाधव, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे, वैशाली खेडेकर, वैशाली इंगळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास वारजे पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news