Fairness Cream Mercury Exposure: गोरेपणाच्या क्रीमचा कथित दुष्परिणाम; तरुण आयसीयूमध्ये, उपचारांवर १२ लाखांचा खर्च!

ऑनलाइन मागविलेल्या फेस क्रीममध्ये पाऱ्याचे अंश असल्याचा युवकाचा आरोप; एफडीएकडून प्रयोगशाळा तपासणी करण्याची मागणी
Fairness Cream Adultration
Fairness Cream AdultrationPudhari
Published on: 
Updated on: 

टाकळी हाजी: चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून ऑनलाइन मागविलेल्या फेस क्रीमचा वापर केल्याने मलठण (ता. शिरूर) येथील तरुणाची प्रकृती गंभीर झाली आहे. गोरेपणाच्या नादात ग्रामीण भागातील अनेकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे प्रमाण वाढले आहे. संबंधित क्रीममध्ये पाऱ्याचे अंश असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे संबंधित युवकाने सांगितले.

Fairness Cream Adultration
Kurkumbh MIDC Blast: कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत भीषण स्फोट; सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ!

त्यांच्यावर सध्या पुण्यातील खराडी येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या उपचारांसाठी तब्बल १० ते १२ लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया आणि ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून चेहरा गोरा करण्याचे आकर्षक दावे करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात केली जाते. कमी कालावधीत चेहरा उजळण्याचे आश्वासन देत ग्राहकांना आकर्षित केले जाते.

Fairness Cream Adultration
Pune Encroachment Drive: पुण्यात अतिक्रमण कारवाईत राजकीय दबाव खपवून घेणार नाही; आयुक्त स्वतः मैदानात उतरणार!

मात्र, अशा उत्पादनांतील रासायनिक घटक आणि त्यांची सुरक्षितता तपासली जाते का? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. संबंधित युवकाने संबंधित क्रीमच्या वापरानंतर प्रकृती गंभीर झाल्याचे स्पष्ट केले आहे. क्रीममधील पाऱ्याच्या कथित अंशामुळे आरोग्यावर परिणाम झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

Fairness Cream Adultration
Court Employees Salary Hike: न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होणार? त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय

या दाव्याची अधिकृत प्रयोगशाळा तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तातडीने दखल घ्यावी. संबंधित क्रीमचे नमुने ताब्यात घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी करावी. त्यामध्ये पारा किंवा अन्य घातक घटक आहेत का, याची खातरजमा करावी, अशी मागणीही युवकाने केली आहे.

Fairness Cream Adultration
Pune Parking Policy: पुण्यात १५ डिसेंबरपासून नवे पार्किंग धोरण; नो पार्किंग झोन आणि रिक्षाथांब्यांचे होणार मार्किंग

जाहिरातींना भुलू नका

आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवून कोणतेही रासायनिक उत्पादन चेहऱ्यावर वापरू नये. उत्पादनातील घटक आणि सुरक्षिततेची खातरजमा करावी. गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे आभार आहेत. संबंधित कंपनीविरोधात ग्राहक आयोगासह सक्षम यंत्रणांकडे दाद मागणार असल्याचेही या युवकाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.