Pune Parking Policy: पुण्यात १५ डिसेंबरपासून नवे पार्किंग धोरण; नो पार्किंग झोन आणि रिक्षाथांब्यांचे होणार मार्किंग

एफ. सी. रोड, सेनापती बापट रस्त्यासह प्रमुख मार्गांवर प्रायोगिक अंमलबजावणी; दोन ते तीन महिने आढावा घेऊन शहरभर विस्तार
Parking Policy
Parking PolicyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: शहरातील अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या आणि बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा होणारा खोळंबा दूर करण्यासाठी महापालिका आता पार्किंग व्यवस्थेत बदल करणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पार्किंग धोरण तयार करण्यात येत असून, १५ डिसेंबरपासून त्याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे.

Parking Policy
Pune Road Widening: पुण्यात कागदोपत्री रस्ता रुंदीकरणाला चाप; प्रत्यक्ष रस्ता झाल्याशिवाय एफएसआय-टीडीआर नाही!

सुरुवातीला दोन ते तीन महिने या धोरणाचा आढावा घेऊन त्याचा परिणाम तपासला जाणार आहे. त्यानंतर आवश्यक बदल करून शहराच्या इतर भागांतही त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

Parking Policy
Pune Air Show: पुण्याच्या आकाशात सुखोईचा थरार; सूर्यकिरण आणि सारंगच्या हवाई कसरतींनी जिंकली मने!

शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी पार्किंग व्यवस्थेतील त्रुटींवरही बोट ठेवले. रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून उपयोग नाही, तर रस्ते मोकळे राहण्यासाठी पार्किंगचे योग्य नियोजन आणि त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. एफ. सी. रोड, सेनापती बापट रस्ता यासह प्रमुख रस्त्यांवर दोन्ही बाजूंना वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.

Parking Policy
Warje Water Wastage: पाणीटंचाईच्या काळात वारजेत पाण्याचा अपव्यय; नादुरुस्त स्प्रिंकलरमधून वाहतेय पाणी

त्यामुळे रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन पार्किंग व्यवस्थेचे नियोजन केले जाणार आहे. या धोरणांतर्गत नो पार्किंगचे फलक, रिक्षाथांब्यांचे फलक आणि रस्त्यांवरील पार्किंगच्या जागांचे मार्किंग करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागांची बैठकही सुरू आहे. १५ डिसेंबरपर्यंत ही तयारी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Parking Policy
Gunjavani Dam Water Storage: गुंजवणी धरणात ८६.६६ टक्के पाणीसाठा; ३ तालुक्यांतील नागरिकांना दिलासा

सुरुवातीला हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर, तर त्यानंतर शहरभर हा उपक्रम राबवला जाणार आहे. काही हॉटेल व्यावसायिकांकडून व्हॅलेट पार्किंगच्या नावाखाली ग्राहकांची वाहने दुसऱ्या रस्त्यांवर उभी केली जातात. या व्यवस्थेचाही अभ्यास करून योग्य नियंत्रण आणण्याची गरज आयुक्तांनी व्यक्त केली. पार्किंग धोरणाबरोबरच पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र धोरणही पुढील १० ते १५ दिवसांत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.