Court Employees Salary Hike: न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होणार? त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; २२ महिन्यांपासून प्रलंबित वेतनश्रेणीच्या प्रस्तावाचा समिती करणार अभ्यास
Money
MoneyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी निश्चित मुदत देण्यात येणार असून, त्यानंतर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २६) दिली. त्यामुळे गेल्या २२ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Money
Pune Parking Policy: पुण्यात १५ डिसेंबरपासून नवे पार्किंग धोरण; नो पार्किंग झोन आणि रिक्षाथांब्यांचे होणार मार्किंग

कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथिगृहात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांचा समावेश असेल.

Money
Pune Road Widening: पुण्यात कागदोपत्री रस्ता रुंदीकरणाला चाप; प्रत्यक्ष रस्ता झाल्याशिवाय एफएसआय-टीडीआर नाही!

उच्च न्यायालयाने यापूर्वी शासनाला सादर केलेल्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत ही समिती अभ्यास करणार आहे. शासनाच्या अन्य विभागांतील समान संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसह राज्याच्या तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराचाही विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Money
Pune Air Show: पुण्याच्या आकाशात सुखोईचा थरार; सूर्यकिरण आणि सारंगच्या हवाई कसरतींनी जिंकली मने!

राज्य सरकारच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लागण्याची अपेक्षा असल्याची माहिती पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट 'क' संघटनेचे अध्यक्ष महेश आलमले आणि सचिव गोरक्षनाथ गोफणे यांनी दिली.

Money
Warje Water Wastage: पाणीटंचाईच्या काळात वारजेत पाण्याचा अपव्यय; नादुरुस्त स्प्रिंकलरमधून वाहतेय पाणी

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार शासनाने विचार करावा व लवकरात लवकर उच्च न्यायालयाने पाठवलेला प्रस्ताव जसाच्या तसा मजूर करण्यात यावा. मागण्या मजूर करण्यास शासनाने विलंब केल्यास पुन्हा संपावर जाणार इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.