Kurkumbh MIDC Blast: कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत भीषण स्फोट; सुरक्षा यंत्रणा अनभिज्ञ!

स्फोटानंतर धुराचे मोठे लोट; औद्योगिक सुरक्षा विभाग आणि अग्निशमन केंद्राला माहितीच नसल्याने सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Kurkumbh MIDC Blast
Kurkumbh MIDC BlastPudhari
Published on: 
Updated on: 

पांढरेवाडी/कुरकुंभ: दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत गुरुवारी (दि. २६) भीषण स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुरकुंभ एमआयडीसीतील त्रिमूर्ती फार्मा कंपनीत झालेल्या या स्फोटानंतर परिसरात धुराचे मोठे लोट उठल्याचे सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडीओ समोर आले आहेत. अचानक झालेल्या स्फोटामुळे कंपनी परिसरात खळबळ उडाली असून, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Kurkumbh MIDC Blast
Pune Encroachment Drive: पुण्यात अतिक्रमण कारवाईत राजकीय दबाव खपवून घेणार नाही; आयुक्त स्वतः मैदानात उतरणार!

स्फोटाची घटना समोर आली असताना औद्योगिक सुरक्षा विभागाला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भीषण स्फोट होऊन धुराचे लोट पसरतात; मात्र संबंधित सुरक्षा विभागाला त्याची कल्पना नसल्याची बाब गंभीर मानली जात आहे.

Kurkumbh MIDC Blast
Court Employees Salary Hike: न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होणार? त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय

इतकी गंभीर घटना घडूनही सुरक्षा विभाग अनभिज्ञ असेल, तर औद्योगिक सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. स्फोटामुळे नेमके किती नुकसान झाले, कोणाला दुखापत झाली का आणि स्फोटामागील कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित यंत्रणांनी वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.

Kurkumbh MIDC Blast
Pune Parking Policy: पुण्यात १५ डिसेंबरपासून नवे पार्किंग धोरण; नो पार्किंग झोन आणि रिक्षाथांब्यांचे होणार मार्किंग

सुरक्षा यंत्रणा नेमकी करते काय?

कुरकुंभ एमआयडीसीमध्ये यापूर्वीही औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आता त्रिमूर्ती फार्मा कंपनीतील स्फोटाच्या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्थेच्या कामकाजाकडे लक्ष वेधले आहे. कंपनीत स्फोट कशामुळे झाला? सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते का? औद्योगिक सुरक्षा विभागाला घटनेची माहिती देण्यात आली होती का? तसेच घटनेनंतर तपासणी करण्यात आली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Kurkumbh MIDC Blast
Pune Road Widening: पुण्यात कागदोपत्री रस्ता रुंदीकरणाला चाप; प्रत्यक्ष रस्ता झाल्याशिवाय एफएसआय-टीडीआर नाही!

त्रिमूर्ती फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटाबाबत कंपनीकडून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. घटनेची माहिती मिळताच आमचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन स्फोटाची कारणे आणि परिस्थितीची माहिती घेतील.

अंकुश खराडे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय

त्रिमूर्ती फार्मा कंपनीतील स्फोटाबाबत कुरकुंभ अग्निशमन केंद्राला कोणताही कॉल आला नव्हता. एमआयडीसीतील कोणत्याही कंपनीत छोटी-मोठी आग किंवा आपत्कालीन घटना घडल्यास अग्निशमन केंद्राला तातडीने कळविणे आवश्यक आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेऊन मदत करते.

किरण पाटील, अग्निशमन अधिकारी, कुरकुंभ एमआयडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.