

नीता परदेशी-रजपूत
माजी नगरसेविका, स्थायी समितीच्या अध्यक्षा, महापालिकेच्या माध्यमिक आणि तांत्रिक समितीच्या अध्यक्षा, स्थापत्य समिती अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग््रेासच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक प्रतिनिधी, स्री संघटना औद्योगिक मंडळाच्या आणि संयुक्त स्री संस्थेच्या अध्यक्षा, अशी नीता परदेशी-रजपूत यांची ओळख. ध्यानी- मनी नसताना महापालिकेची निवडणूक त्यांना लढवावी लागली. आपल्या वक्तृत्व शैलीच्या जोरावर अगदी लहान वयात अनुभवी व मात्तबरांचा त्यांनी पराभव केला. या संस्मरणीय लढतीविषयी त्यांच्याच शब्दांत...
तंत्र्य सैनिक व उत्तम वक्ते रामप्रसाद परदेशी हे माझे काका. त्यामुळे घरातूनच समाजकारणाचा वारसा मिळाला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना काँग््रेास सेवा दलाचे काम करत होते. 1983-84 मध्ये एनएसयूआयची सचिवही होते. माजी पंतप्रधान आणि दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त काँग््रेास हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमात शालूताई बुद्धीवंत यांनी मला अचानक इंदिरा गांधीविषयी बोलायला सांगितले. त्यावेळी केलेल्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. एमएसडब्ल्यू करत असताना मुला- मुलींची बालसुधारगृहे, कारागृहे आदी ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. समाजातील विविध जाती-जमातींवर एक विशेष पेपरही सादर केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गरजूंना रेशनकार्ड मिळवून देणे, संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज भरून देणे, अशी छोटी छोटी कामे करत होते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची जाण व अनुभव मिळत गेला. त्याचवेळी कुठेतरी कामगार कल्याण अधिकारी, सरकारी कार्यालयात वा बँकेत नोकरी मिळविण्याचे माझे प्रयत्न सुरू होते.
याच वेळी राजकारणात महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले. मात्र, तरीही निवडणूक लढवावी, असे कधी वाटले नाही. 1992 च्या महापालिका निवडणुकीत सदाशिव- शुक्रवार पेठ हा आमचा वॉर्ड जेव्हा महिला राखीव झाला, तेव्हा काकांनीच मला निवडणुकीला उभी राहतेस का? असे विचारले. मी 26-27 वर्षांची होते. माझे शिक्षण व सामाजिक कार्याची आवड लक्षात घेऊन सुरेश कलमाडी यांनी मला तिकीट दिले.
उमेदवारी तर मिळाली, पण निवडणुकीचा कसलाही पूर्वानुभव नाही. निवडणुकीचे तंत्र- मंत्र ठाऊक नाहीत. तब्येतीनेही बारीक, त्यामुळे मतदारांवर प्रभाव कसा पडणार, असे अनेक प्रश्न होते. परंतु, काका व भागातील काँग््रेासचे निष्ठावंत कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन माझ्या प्रचाराची धुरा हाती घेतली. माझ्या विरोधात बाबा आढाव यांच्यासोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कमल पायगुडे अपक्ष म्हणून रिंगणात होत्या. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पती व अनुभवी नेते काका पायगुडे यांच्याकडे होती. तर भाजपने खैरे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आमच्या वॉर्डातील महिलांच्या या तिरंगी लढतीकडे सर्व शहराचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ व अनुभवी विरोधकांच्या विरोधात आपण काय व कसे बोलायचे हा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. परंतु, शुक्रवार पेठेतील सेवा मित्रमंडळाच्या एका उपक्रमाने ही कोंडी फुटली.
सेवा मित्रमंडळाने सर्वपक्षीय उमेदवारांना समोरासमोर आणण्यासाठी तेथील चौकातच एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. शुक्रवार-सदाशिव पेठेच्या या वॉर्डातून रिंगणात असलेल्या 6 ते 7 महिला उमेदवार व्यासपीठावर होत्या. या सभेत काय व कसे बोलावे याचे मार्गदर्शन काकांनी केले होते. त्याआधारे मी केलेले घणाघाती भाषण खूपच गाजले. वर्तमानपत्रांतूनही त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे वातावरण पलटून गेले आणि प्रचारादरम्यान त्याची प्रचिती मला येऊ लागली. सदाशिव पेठेतील मतदारांना पक्षापेक्षा सुशिक्षित, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असलेली आणि जिला केव्हाही काम सांगता येऊ शकेल, अशी उमेदवार हवी होती. माझ्या रूपाने त्यांच्या अपेक्षांना उतरणारी उमेदवार त्यांना मिळाली होती. त्यामुळेच घराजवळील मतांबरोबरच आंग््रेा वाडा आणि सदाशिव पेठेतूनही मला भरभरून मतदान झाले.
प्रतिस्पर्धी उमेदवार काकी पायगुडे या समाजवादी- निरीश्वरवादी विचारसरणीच्या होत्या. वॉर्डात चौकाचौकात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीची मंदिरे होती. तेथील गणपतीला पुष्पहार अर्पण करून नंतरच उमेदवाराने प्रचार सुरू करावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. काकी निरीश्वरवादी असल्याने देवाला हार घालणे त्यांना मान्य नसावे, त्यामुळे गेल्याबरोबरच मंदिरात न जाता त्या प्रचाराला सुरुवात करीत असत. अनेक कार्यकर्त्यांना हे आवडत नसावे, त्याचाही परिणाम त्यांच्या मतदानावर झाला असावा, असे मला वाटते. भाजपच्या खैरेताईंची मदार हक्काच्या पारंपरिक मतांवर होती. परंतु, त्यांच्याही काही मतदारांनी मला झुकते माप दिल्याने 32 मतांनी मी विजयी झाले.
नोकरीची संधी गेली, पण नगरसेविका झाले...
मतमोजणीच्या दिवशी दुपारी मला टेल्को कंपनीमध्ये कामगार कल्याण अधिकारी पदाच्या मुलाखतीला जायचे होते. निवडणुकीत मी विजयी झाले. त्यानंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीत मुलाखतीची ही वेळ टळून गेली. मुलाखतीला जाता न आल्याने ही नोकरीची संधी गेली पण, नगरसेवक झाल्यामुळे समाजासाठी काम करण्याची अनेक दालने माझ्यासाठी खुली झाली. नगरसेवक म्हणून काम करताना एमएसडब्ल्यूच्या शिक्षणाचा भरपूर फायदा झाला. महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत मुलांसाठी उन्हाळी शिबिरे, काँग््रेास भवनमागील पाळणाघराची कल्पना, तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचे होस्टेल यातूनच करू शकले. महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यातही माझा सहभाग होता.