Amedia Stamp Duty Waiver: मुद्रांक शुल्क माफी योग्यच! ‘अमेडिया’कडून २१ कोटींची नोटीस अमान्य

कोरेगाव पार्क व्यवहारावर कंपनीचा ठाम दावा; नोंदणी विभागाचा निर्णय पुढील आठवड्यात अपेक्षित
Stamp Duty Waiver
Stamp Duty WaiverPudhari
Published on
Updated on

पुणे: कोरेगाव पार्क येथील शासकीय जागेच्या खरेदीप्रकरणात घेतलेली मुद्रांक शुल्क माफी पूर्णपणे नियमात बसणारी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या 'अमेडिया' कंपनीने नोंदणी विभागासमोर केला आहे. विभागाने २१ कोटी रुपये भरण्याबाबत बजावलेली नोटीसही कंपनीकडून अमान्य करण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे नोंदविल्यानंतर पुढील पाच ते सात दिवसांत अंतिम निर्णय नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग घेणार आहे.

Stamp Duty Waiver
Pune Tanker Water Leakage Accidents: टँकरमधील पाणीगळतीमुळे दुचाकी अपघातांत वाढ

गेल्या महिन्यात 'अमेडिया' कंपनीकडून महारवतनातील ४० एकर जागेचा व्यवहार झाल्याचे समोर आल्याने हा मुद्दा गाजला होता. जमिनीची किंमत कमी दाखवून मुद्रांक शुल्काची बचत केल्याचा आणि उद्योग संचालनालयाकडून २१ कोटींची माफी मिळवल्याचा आरोप या व्यवहारावर झाला.

Stamp Duty Waiver
Sinhagad Leopard Attack: सिंहगडमध्ये बिबट्यांची दहशत वाढली! 10 हून अधिक बिबट्यांचा वावर, कुत्री-गाय-वासरांचा फडशा

त्यानुसार विभागाने 'अमेडिया'चे भागीदार दिग्विजसिंह पाटील आणि जागेच्या कुलमुखत्यारपत्रधारक शीतल तेजवानी यांना ७ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावली होती. व्यवहार रद्द करण्यासाठीची २१ कोटी आणि माफीपोटीची २१ कोटी, अशा एकूण ४२ कोटींची रक्कम जमा करण्याची मागणी या नोटिशीत करण्यात आली होती.

Stamp Duty Waiver
Pune AYUSH Hospital: पुण्यातील आयुष रुग्णालयाला मोठी पसंती! दीड वर्षांत 48,000 हून अधिक रुग्णांवर मोफत उपचार

उत्तरासाठी प्रारंभी १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर कंपनीने १४ नोव्हेंबर रोजी मुदतवाढ मागितल्याने २४ नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आली. मात्र, पुन्हा मुदतवाढ अर्ज आल्यानंतर ४ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत वाढवण्यात आली. त्यानुसार गुरुवारी दिग्विजसिंह पाटील यांच्या वतीने वकिलांनी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागासमोर आपले म्हणणे सविस्तर मांडले. या सुनावणीत २१ कोटींची माफी योग्य असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. २१ कोटींच्या वसुलीबाबतची नोटीसही अमान्य असल्याचे सांगत वकिलांनी लेखी अर्ज जमा केला.

Stamp Duty Waiver
Pune Sexual Assault Case: विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपी अटक

अमेडिया कंपनीकडून त्यांचे म्हणणे गुरुवारी मांडण्यात आले. आमच्याकडून बजावलेली नोटीस कंपनीने अमान्य केली आहे. पुढील निर्णय विभाग पाच ते सात दिवसांत घेणार आहे.

संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news