Pune Tanker Water Leakage Accidents: टँकरमधील पाणीगळतीमुळे दुचाकी अपघातांत वाढ

उंड्री–कोंढवा–वानवडी परिसरातील नागरिकांची तक्रार; गळती करणाऱ्या टँकरवर कारवाईची मागणी
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

 कोंढवा: टँकरमधून रस्त्यावर होणार्‍या पाणीगळतीमुळे दुचाकी अपघातांत वाढ झाली आहे. अनेकांना गंभीर दुखापतीबरोबरच अपंगत्व आले आहे. पाण्याची गळती होणार्‍या टँकरर्स कारवाई व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

Accident
Pune AYUSH Hospital: पुण्यातील आयुष रुग्णालयाला मोठी पसंती! दीड वर्षांत 48,000 हून अधिक रुग्णांवर मोफत उपचार

उंड्री, महंमदवाडी, कोंढवा, पिसोळी, वानवडी या भागात महापालिकेच्या व खासगी टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही टँकर सुस्थितीत पाहायला मिळतात, तर काही टँकरची अवस्था अगदीच वाईट आहे. रस्त्यावरून जाताना पाणीगळती होतेच होते.

Accident
Pune Sexual Assault Case: विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपी अटक

शिवाय, चढाच्या ठिकाणी टँकरच्या वरच्या भागातून धो-धो पाणी रस्त्यावर पडते. यामुळे रस्ता निसरडा होतो. त्यामुळे दुचाकी वाहने या रस्त्यावर घसरत आहेत. यामध्ये युवकांचा व ज्‍येष्ठ नागरिकांचे अपघात जास्त प्रमाणात होत आहेत.

Accident
Pune District Municipal Election: पुणे जिल्ह्याच्या चार नगरपरिषदांमध्ये महिला मतदार 'गेमचेंजर'! 'लाडक्या बहिणीं' ठरवणार लोणावळा, इंदापूरचा निकाल

पाण्याच्या जास्तीत जास्त खेपा कशा होतील, त्या पद्धतीने टँकरची गती पाहायला मिळते. काही टँकरची अवस्था अशी आहे की, त्यांच्या नंबरप्लेटदेखील दिसत नाहीत. कर्णकर्कश हाॅर्नच्‍या आवाजामुळे ज्‍येष्ठ नागरिकांची धांदल उडून जाते.

Accident
Pune Abu Dhabi Flight: पुण्याहून थेट 'अबू धाबी'साठी नवी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी 173 प्रवाशांनी केला प्रवास

साळुंखे विहार रस्त्यावरून एनआयबीएम रस्त्याकडे जाताना सूर्या हार्डवेअर दुकानासमोर गुरुवारी दुपारी एका युवकाचा अपघात झाला, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. असे अपघात टँकरमधील पाणीगळतीमुळे अनेक ठिकाणी होत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी स्‍थानिक नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news