Maharashtra State Cooperative Bank UPI: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ‘यूपीआय स्वीकारकर्ता बँक’; देशातील पहिली शिखर बँक

‘एअरपे’सोबत सहयोग; देशातील पहिली शिखर बँक म्हणून डिजिटल व्यवहारांना चालना
Maharashtra State Cooperative Bank
Maharashtra State Cooperative BankPudhari
Published on
Updated on

पुणे: सहकारातील बँकिंग व्यवहार अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी आणि इतर सर्व संस्थांना आधुनिक डिजीटल पेमेंट प्रणालीशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने “एअरपे” या टेक्नॉलॉजी कंपनीबरोबर सहयोग करार करत स्वतंत्र “यूपीआय स्वीकारकर्ता बँक” म्हणून सेवा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. अशाप्रकारे यूपीआय व्यवहार स्वीकारणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली शिखर बँक ठरल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. त्यामुळे यूपीआय सेवा घेण्यासाठी व्यापारी बँकांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

Maharashtra State Cooperative Bank
Maharashtra Sahitya Parishad Election Result: महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक निकाल आज; कोणाच्या हाती जाणार सत्ता?

राज्यातील ग््राामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकारातील त्रिस्तरीय रचनेत शिखर बँक म्हणून कार्यरत असलेल्या राज्य सहकारी बँकेसह, राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सुमारे 21 हजारांहून जास्त विकास सोसायट्यांचा समावेश होतो. “सहकाराअंतर्गत सहकार” या सहकारातील सर्वोच्च तत्वानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

Maharashtra State Cooperative Bank
Census 2027 Self Enumeration: जनगणना 2027 साठी मोबाईलवर स्वगणना; 1 ते 15 मेदरम्यान संधी

सध्या अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि नागरी सहकारी बँकांना यूपीआय सेवा घेण्यासाठी व्यापारी बँकांवर अवलंबून राहावे लागते. यापुढे मात्र राज्य सहकारी बँकेने “यूपीआय स्वीकारणारी बँक” हा दर्जा प्राप्त केल्याने सहकार क्षेत्रातील आर्थिक व्यवहार यापुढे सहकार व्यवस्थेच्या अंतर्गतच सुरक्षित राहतील.

Maharashtra State Cooperative Bank
Egg Price Fall Poultry Industry: निर्यात घटल्याने अंड्यांचे दर घसरले; पोल्ट्री उद्योग अडचणीत

या प्रकल्पामुळे सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार सुलभ व जलद होण्याबरोबरच त्यामध्ये अधिक पारदर्शकता येईल व सहकारावरील विश्वास वाढीस लागेल. डिजीटल क्रांतीच्या या युगात ग््राामीण भागातील सभासद आणि शेतकऱ्यांना आधुनिक बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या दिशेने पडलेले हे योग्य पाऊल म्हणावे लागेल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे राज्याचे सहकार क्षेत्र अधिक डिजीटल सक्षम होईल व सदर प्रणाली अधिक स्वावलंबी होईल, असा विश्वासही अनास्कर यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra State Cooperative Bank
Pune Municipal Health Budget: महापालिकेच्या आरोग्य बजेटचा मोठा हिस्सा 52 हजार कुटुंबांवर खर्च

बँकांसह दूध संघ, कारखाने, इतरही सहकारी संस्थांना होणार लाभ

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने या उपक्रमाअंतर्गत स्वत:चे यूपीआय हॅण्डल म्हणजे ओळख राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, नागरी सहकारी बँका व विविध कार्यकारी संस्थाबरोबरच दूध संघ, साखर कारखाने व सहकारातील इतर सर्व संस्थांना देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या संस्थांना पेमेंट कलेक्शनसाठी आता शिखर बँकेचे अधिकृत वेबसाइट वापरता येणार आहे. अशाप्रकारे स्वत:चे अधिकृत यूपीआय हॅण्डल असणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली व एकमेव राज्य बँक ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news