Census 2027 Self Enumeration: जनगणना 2027 साठी मोबाईलवर स्वगणना; 1 ते 15 मेदरम्यान संधी

1 ते 15 मेदरम्यान नागरिकांना माहिती भरता येणार; 16 मे ते 15 जून घरगणना प्रक्रिया
Census
CensusPudhari
Published on
Updated on

पुणे: देशभरात जनगणनेच्या आधी 16 मे ते 15 जून या कालावधीत घरयादी व घरगणना होणार आहे. नागरिकांनी 1 ते 15 मे यादरम्यान मोबाईलवरून स्वगणना (सेल्फ एन्युमरेशन) करावी. यामुळे प्रगणकांना मदत होणार आहे. यानंतर प्रगणकांकडून पडताळणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Census
Egg Price Fall Poultry Industry: निर्यात घटल्याने अंड्यांचे दर घसरले; पोल्ट्री उद्योग अडचणीत

जनगणना 2027 ही 1872 पासूनची देशातील 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. ही जनगणना पहिल्यांदा मोबाईलच्या माध्यमातून होणार आहे. ‌‘सेन्सस 2027-एचएलओ‌’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत प्रगणक आणि पर्यवेक्षक हे महत्त्वाचे घटक असतील. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या माध्यमातून 16 मे ते 15 जून यादरम्यान घराघरांतून अचूक माहिती संकलित केली जाणार आहे.मात्र, त्यापूर्वी सर्व नागरिकांना स्वगणना करता येणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून 1 ते 15 मेदरम्यान संकेतस्थळावरून संपूर्ण माहिती भरता येणार आहे. एका प्रगणकाला साधारण 150 कुटुंबातील 700 ते 800 जणांची माहिती भरावी लागणार आहे.

Census
Pune Municipal Health Budget: महापालिकेच्या आरोग्य बजेटचा मोठा हिस्सा 52 हजार कुटुंबांवर खर्च

नागरिकांना स्वगणनेच्या माध्यमातून साधारण 33 प्रकारची माहिती भरावी लागणार आहे. स्वगणना नागरिकांनी केली, तर प्रगणक ही माहिती बरोबर आहे का? ते तपासून पाहतील आणि पुढे शासनाला पाठवून देतील. नागरिकांनी स्वगणना केल्यास प्रगणकांचे थोडे काम आणि वेळ वाचणार आहे. नागरिकांनी स्वगणना करताना खरी माहिती भरावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Census
Rajgad Forest Wildlife Water Crisis: राजगड वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे; वन्यजीवांवर पाण्याचे संकट

जनगणनेला इंटरनेटचा अडथळा ठरणार नाही

यंदा प्रथमच मोबाईलच्या माध्यमातून जनगणना केली जाणार आहे. साधारण 33 प्रकारची माहिती प्रगणकाला भरावी लागणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी इंटरनेट नसल्यास जनगणना कशी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरीही कुटुंबाची माहिती भरल्यानंतर नेटवर्कमध्ये आल्यानंतर ही माहिती शासनाला पाठवता येणार आहे. यामुळे जनगणना करताना इंटरनेटचा कुठलाही अडथळा नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Census
Pune Delayed Courier Compensation: दिवाळी फराळ उशिरा पोहोचला; कुरिअर कंपनीला भरपाईचे आदेश

जनगणना 2027 दोन टप्प्यांत राबविणार

पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना (2026) केली जाईल. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, मालमत्ता आदी बाबींची माहिती संकलित करून पुढील लोकसंख्या गणनेसाठी आधारभूत चौकट तयार केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (2027) करण्यात येणार असून, ठरावीक संदर्भ दिनांक व वेळेनुसार प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती नोंदविण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news