Maharashtra School Assessment: पहिली ते आठवीच्या मूल्यमापनात मोठे बदल; कला शिक्षणात प्रात्यक्षिकांसह लेखी चाचणीही अनिवार्य

२०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी एससीईआरटीच्या सुधारित सूचना; सहावीच्या व्यावसायिक शिक्षणात प्रात्यक्षिकांना ७५ टक्के, तर लेखी परीक्षेला २५ टक्के गुणभार
School Assessment
School AssessmentPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यातील नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सुधारित सूचना जाहीर करण्यात आल्या असून, कलाशिक्षणात प्रत्यक्ष सादरीकरण आणि लेखी चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, इयत्ता सहावीपासून सुरू झालेल्या व्यावसायिक शिक्षणासाठी प्रात्यक्षिकांना ७५ टक्के, तर लेखी परीक्षेला २५ टक्के गुणभार निश्चित करण्यात आला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार विषयांचे मूल्यमापन कसे करावे, याबाबत शाळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

School Assessment
Sugarcane Harvesting Transport Cost: ऊसतोडणी-वाहतुकीच्या खर्चात पारनेरचा कारखाना आघाडीवर; प्रतिटन १,३८५ रुपयांची कपात

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे (एससीईआरटी) संचालक मंगेश जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे माहिती दिली. नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी बदल लागू झाले आहेत. मात्र, ज्या विषयांच्या नावांत बदल झालेला नाही किंवा जुनाच अभ्यासक्रम सुरू आहे, त्यांच्यासाठी पूर्वीची मूल्यमापन पद्धती कायम राहणार आहे. ‘परिसर अभ्यास’ या विषयाचे नाव बदलून ‘आपल्या सभोवतालचे जग’ असे करण्यात आले आहे. या विषयासाठी इयत्ता तिसरी व चौथीमध्ये आकारिक मूल्यमापनासाठी ६० टक्के आणि संकलित मूल्यमापनासाठी ४० टक्के गुणभार राहील. इयत्ता पाचवीसाठी दोन्ही प्रकारच्या मूल्यमापनाचा गुणभार प्रत्येकी ५० टक्के असेल. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षांसाठी यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

School Assessment
Indian Railway Parcel Service: रेल्वेची नवी सुविधा! आता घरातूनच पार्सल बुक करा, थेट इच्छित पत्त्यावर होणार डिलिव्हरी

विद्यार्थ्यांना वर्षभरात सजीवाधारित, यंत्र व साहित्याधारित आणि मानवी सेवाधारित या तीन कार्यक्षेत्रांमधून प्रत्येकी एक, असे एकूण तीन प्रकल्प पूर्ण करणे अनिवार्य आहे. प्रकल्पांचे मूल्यमापन करताना विषयाची निवड, नियोजन, साधनांचा वापर, सुरक्षिततेचे नियम, समस्या सोडवण्याची क्षमता, निष्कर्ष आणि सादरीकरण या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत. प्रकल्प व उपक्रम पुस्तिकेचे मूल्यमापन केवळ सत्राच्या शेवटी न करता कामाच्या प्रत्येक टप्प्यावर करावे, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी अभिप्राय द्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

School Assessment
Malegaon Sugar Factory: माळेगाव कारखान्याचा शेतकऱ्यांना दिलासा; अंतिम ऊसदरापोटी प्रतिटन १५० रुपये जमा

विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य तपासणार

कला शिक्षणात केवळ चित्रकला किंवा कागदावरील कामापुरते मूल्यमापन मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कलाकृती, सादरीकरण कौशल्य, कल्पकता आणि आत्मविश्वासाचाही विचार केलाए जाणार आहे. यासाठी निर्धारित आठ साधन-तंत्रांपैकी किमान पाच साधनांचा वापर करावा लागणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष सादरीकरण आणि लेखी चाचणी या दोन्हींचा समावेश बंधनकारक आहे. दृश्यकला, रंगमंच, संगीत, नृत्य आणि हालचाल या कलाप्रकारांतील विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य तपासले जाणार आहे.

School Assessment
Ujani Crime Activities: उजनीत पुन्हा गुन्हेगारीच्या हालचाली? वाळू आणि मत्स्यव्यवसायावर वर्चस्व मिळवण्याच्या चर्चेने चिंता

वर्षभरात तीन प्रकल्प पूर्ण करावे लागणार

इयत्ता सहावीच्या व्यावसायिक शिक्षण विषयासाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कामाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. या विषयात लेखी चाचणीसाठी २५ टक्के, तर प्रात्यक्षिकांसाठी ७५ टक्के गुणभार निश्चित केला आहे. लेखी चाचणी, प्रकल्प, उपक्रम पुस्तिका, प्रात्यक्षिक परीक्षा आणि क्षेत्रभेट, सर्वेक्षण, भूमिकाभिनय किंवा मुलाखत यांसारख्या साधनांद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news