Malegaon Sugar Factory: माळेगाव कारखान्याचा शेतकऱ्यांना दिलासा; अंतिम ऊसदरापोटी प्रतिटन १५० रुपये जमा

गेटकेनधारकांना प्रतिटन १०० रुपये, कामगारांना १५ टक्के ॲडव्हान्स बोनस; दुसरीकडे दुष्काळी स्थितीत कारखाने बंद न ठेवता जळालेल्या उसाचे गाळप करण्याची मागणी
Sugar Factory
Sugar FactoryPudhari
Published on: 
Updated on: 

शिवनगर: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मधील गाळप उसाचे अंतिम १५० रुपये प्रतिटन, तर गेटकेनधारकांना १०० रुपये प्रतिटनप्रमाणे पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहे. तसेच या आर्थिक वर्षामध्ये कामगारांना देखील १५ टक्के ॲडव्हान्स बोनस दिला जाणार आहे.

Sugar Factory
Ujani Crime Activities: उजनीत पुन्हा गुन्हेगारीच्या हालचाली? वाळू आणि मत्स्यव्यवसायावर वर्चस्व मिळवण्याच्या चर्चेने चिंता

याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी माहिती दिली. यावेळी संचालक तानाजी कोकरे, योगेश जगताप, शिवराज जाधवराव, प्रताप आटोळे, गणपत खलाटे, चंद्रशेखर जगताप, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

माळेगाव कारखान्याने मागील गाळप हंगामात १० लाख ८९ हजार ६८३ मे.टन उसाचे गाळप केले होते, तर १२.२८ साखर उताऱ्यानुसार १२ लाख ७७ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. हंगामाची एफआरपी ३२६९ रुपये प्रति मे.टन असून त्यापेक्षा ३८१ रुपये प्रतिटन अधिक देऊन अंतिम ऊसदर ३६५० मे.टन इतका जाहीर केलेला होता. यापूर्वी कारखान्याने ३५०० रुपये प्रतिटन याप्रमाणे सभासदांना रक्कम अदा केलेली आहे. तसेच गेटकेन धारकांना ३३०० रुपये व ३४०० रुपये प्रतिटन याप्रमाणे पैसे दिले आहेत.

Sugar Factory
Pune Water Cut: पुणेकरांवर २० टक्के पाणीकपातीचे संकट? आज कालवा समितीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

दरम्यान, कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद व गेटकनधारकांचे पेमेंट साधारणपणे १४ कोटी ४५ लाख तसेच सभासद ठेवीवरील व्याज, वैयक्तिक ठेवीवरील व्याज ३ कोटी ३८ लाख रुपये नुकतेच अदा केले आहेत. तसेच सन २०२३-२४ मध्ये व्हरायटी उसाचे व खोडवा उसाचे देय अनुदान १ कोटी ७२ लाख रुपये अशी एकूण १९ कोटी ५५ लाख रुपये इतकी रक्कम बँकेत वर्ग केली आहे. बोनससाठी ४ कोटी ८ लाखांची तरतूद करून ही रक्कम दोन ते तीन दिवसांत कामगारांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.

माळेगाव कारखान्याने उपमुख्यमंत्री व अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेला ऊसदर हा उच्चांकी आहे. त्यामुळे सभासद, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामध्ये कारखान्याचे सभासद, व्यवस्थापन, तोडणी, वाहतूकदार,अधिकारी, कामगार यांचे मोठे योगदान असल्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी सांगितले.

Sugar Factory
Velhe Mulshi Conservation Reserve: वेल्हे-मुळशी संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी; सह्याद्रीच्या जैवविविधतेला मिळणार संरक्षण

ऊसगाळप हंगाम बंद ठेवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहा

बारामती तालुक्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, पाणीटंचाई, हुमणीचा प्रादुर्भाव आणि ऊस जळीत अशा विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत सहकारी साखर कारखानदारीसमोर देखील ऊसगाळपाचे नियोजन करताना अनेक अडचणी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊसगाळप हंगाम बंद ठेवण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केले.

निंबुत परिसरातील खंडोबाचीवाडी येथे ऊस जळीत झाल्याची माहिती मिळताच गायकवाड यांनी शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली, तसेच जळालेल्या उसाचे लवकरात लवकर गाळपासाठी नियोजन करण्याबाबत माहिती दिली. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उसाच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करण्याच्या मागणीसाठी सोमेश्वरसह अन्य साखर कारखान्यांचा गाळप हंगाम दोन दिवस बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

Sugar Factory
Pune Robbery Case: पुण्यात भरदिवसा ३० लाखांची लूट; दरोड्याऐवजी ‘प्रॉपर्टी मिसिंग’ची नोंद!

याबाबत प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले, राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या अडचणींची त्यांना चांगली जाण आहे. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. एमएसपी आणि इथेनॉलच्या दरवाढीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे योग्य आहे; मात्र दुष्काळजन्य परिस्थितीत कारखाने बंद ठेवणे योग्य नाही.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. एमएसपीच्या दरवाढीसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खा. पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली आहे. सध्याचा गाळप हंगाम आव्हानात्मक असून, शेतकरी आणि कारखानदारीसमोरील अडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील या वेळी ऋषिकेश गायकवाड यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news