Indian Railway Parcel Service: रेल्वेची नवी सुविधा! आता घरातूनच पार्सल बुक करा, थेट इच्छित पत्त्यावर होणार डिलिव्हरी

पुण्यासह आठ शहरांत ‘रेल पार्सल ॲप–घर से घर तक’ सेवा सुरू करण्याची तयारी; ऑनलाइन बुकिंग, डिजिटल पेमेंट आणि घरपोच वितरणाची सुविधा मिळणार
Indian Railway Parcel Service
Indian Railway Parcel ServicePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: भारतीय रेल्वेने आपल्या सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने लवकरच घरातून पार्सल स्वीकारून ते इच्छित ठिकाणी घरपोच पोहोचविणारी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला यश मिळाल्यानंतर आठ शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Indian Railway Parcel Service
Malegaon Sugar Factory: माळेगाव कारखान्याचा शेतकऱ्यांना दिलासा; अंतिम ऊसदरापोटी प्रतिटन १५० रुपये जमा

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्‍नई, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू आणि पुणे या शहरांतील ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येईल. रेल्वेने वाहतूक करण्यात येणारे पार्सल घरातून घेणे आणि संबंधित पत्त्यावर घरपोच वितरण करणे, यासाठी 'रेल पार्सल ॲप–घर से घर तक' ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Indian Railway Parcel Service
Ujani Crime Activities: उजनीत पुन्हा गुन्हेगारीच्या हालचाली? वाळू आणि मत्स्यव्यवसायावर वर्चस्व मिळवण्याच्या चर्चेने चिंता

याशिवाय, संबंधित लॉजिस्टिक्स कंपन्या पार्सलचे पॅकिंग आणि इतर सेवाही उपलब्ध करून देऊ शकतील. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नियोजित रेल्वेगाडी सुटण्याच्या १५ दिवस आधी घरपोच पार्सल सेवेसाठी बुकिंग सुरू होईल. ग्राहकांना गाडी सुटण्याच्या एक दिवस आधीपर्यंत पार्सल बुक करता येईल. लॉजिस्टिक्स भागीदारांना गाडी सुटण्याच्या एक तास आधीपर्यंत पार्सल रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करता येईल.

Indian Railway Parcel Service
Pune Water Cut: पुणेकरांवर २० टक्के पाणीकपातीचे संकट? आज कालवा समितीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

सणासुदीच्या काळात पार्सल वाहतुकीला सवलत

दिवाळी आणि ख्रिसमसच्या सणासुदीच्या काळात व्यावसायिकांकडून मालाचा साठा वाढविला जातो. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने या महिन्याच्या सुरुवातीला पार्सल वाहतुकीसाठी आणखी एक सवलतीची योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार, पार्सल एकत्रित करणाऱ्या कंपन्यांना पार्सल वाहतुकीसाठी येण्या-जाण्याचे (राऊंड ट्रिप) बुकिंग करता येईल. त्यासाठी एकेरी वाहतुकीच्या भाड्याच्या दीडपट रक्कम आकारली जाईल. या नव्या गणितामुळे दोन्ही बाजूंच्या एकत्रित वाहतूक भाड्यात २५ टक्के कपात होणार आहे. मात्र, ही सवलत रेल्वेच्या सर्व प्रकारच्या पार्सल बुकिंगसाठी सरसकट लागू होणार नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

खासगी लॉजिस्टिक्स कंपन्यांची मदत

या सेवेसाठी रेल्वे लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भागीदार कंपन्यांची मदत घेणार आहे. या कंपन्या ग्राहकांच्या घरातून पार्सल स्वीकारतील आणि रेल्वेस्थानकावरून ते अंतिम ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडतील. दोन रेल्वेस्थानकांदरम्यान पार्सलची वाहतूक मात्र भारतीय रेल्वेकडून केली जाईल.

Indian Railway Parcel Service
Velhe Mulshi Conservation Reserve: वेल्हे-मुळशी संवर्धन राखीव क्षेत्राला मंजुरी; सह्याद्रीच्या जैवविविधतेला मिळणार संरक्षण

मोबाईल ॲपवरून बुकिंग आणि ऑनलाइन पेमेंट

या सेवेसाठी विकसित करण्यात येणारे मोबाईल ॲप ग्राहक आणि निवडक लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादार यांच्यातील डिजिटल व्यासपीठ म्हणून काम करेल. ग्राहकांना ॲपवरून पार्सल बुक करता येईल आणि त्याचे पैसेही ऑनलाइन भरता येतील.

बुकिंग रद्द केल्यास रेल्वे भाड्याचा परतावा

ग्राहकाने पार्सल उचलण्यापूर्वी बुकिंग रद्द केल्यास रेल्वे वाहतूक भाड्याचा संपूर्ण परतावा दिला जाईल. मात्र, त्यातून १० रुपये लिपिकीय शुल्क (क्लर्केज चार्ज) वजा केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news