Maharashtra Board Solar Energy Initiative: राज्य मंडळाचा ‘ग्रीन एनर्जी’वर मोठा निर्णय

सौर पॅनेल, वॉटर हार्वेस्टिंगसह परीक्षा फी सीएसआरमधून भरण्याचा निर्णय; शिक्षण मंडळात हरित क्रांतीची सुरुवात
Solar
SolarPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विभागीय कार्यालये तसेच मुख्य कार्यालयात सौर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ऊर्जाबचत करणारी उपकरणे बसविण्यात येणार आहेत. तसेच वॉटर हार्वेस्टिंग देखील करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे राज्य मंडळाने ग््राीन एनर्जीसाठी पुढाकार घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Solar
Lavani Censor Board Demand: लावणी व लोककलांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची मागणी

डॉ. कुलकर्णी म्हणाले, नऊ विभागीय मंडळांसह मुख्य कार्यालयाचा ग््राीन एनर्जीसाठी सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आणि त्याला तांत्रिक मान्यता घेऊन मंजुरीसाठी जिल्हा नियोजन व विकास परीषद अर्थात डीपीडीसीकडे निधीच्या मंजुरीसाठी देण्यात आली आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत सर्व इमारतींचे सोलरायझेशन करण्यात येणार आहे.

Solar
Pune Hospital Biomedical Waste: कमला नेहरू रुग्णालयात कचऱ्याचा ढीग; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या मंडळांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा जास्त उपकरणे ही मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरणारी आहेत. त्यामुळे ऊर्जा वाचवणारी उपकरणे बसविण्यात येणार आहेत. हे काम ऊर्जा दक्षता ब्युरो अर्थात बीईई या संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. जवळपास 48 लाख रुपयांची उपकरणे या माध्यमातून बसविली जाणार आहेत. त्याचबरोबर सर्वच कार्यालयांत वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. यातून मंडळाच्या सर्व सुविधा या पर्यावरणपूरक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Solar
Sugar Control Order: ऊस नियंत्रण आदेश 2026 मध्ये सुधारणा; साखर उद्योगाच्या महत्त्वाच्या मागण्या

सीएसआरच्या माध्यमातून सर्व मंडळांसाठी आवश्यक तब्बल 300 संगणक नवीन घेतले जाणार आहेत. त्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे. यामुळे मंडळाचे कामकाज वेगवान होणार आहे. तसेच, रजिस्टर ठेवण्यासाठी कपाटांची देखील खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या पायाभूत सुविधांमध्ये आता आमूलाग््रा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Solar
Sugar Export Ban: साखर निर्यात बंदीवर फेरविचाराची मागणी; उद्योग संकटात जाण्याची भीती

मुलींची परीक्षा फी आता सीएसआरमधून

राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेसाठी केवळ परीक्षा शुल्क नाही म्हणून अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विद्यार्थिनींचे परीक्षा शुल्क सीएसआरच्या माध्यमातून भरण्यासाठी राज्य मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी काही कंपन्यांना काही जिल्हे, तालुके दत्तक घेण्याची विनंती केली जाईल त्यानुसार, संबंधित जिल्ह्यातील विद्यार्थिंनींचे दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायीत्व या माध्यमातून भरले जाणार आहे. त्यासाठी लवकरच राज्य शासनाची मान्यता घेतली जाणार असल्याचे देखील डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news