Pune Hospital Biomedical Waste: कमला नेहरू रुग्णालयात कचऱ्याचा ढीग; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

चार दिवस कचरा उचलला न गेल्याने दुर्गंधी; रुग्ण व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात, महापालिकेवर टीका
Pune Hospital Biomedical Waste
Pune Hospital Biomedical WastePudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळ कारभाराचे विदारक चित्र आता महापालिकेच्याच रुग्णालयांत समोर येऊ लागले आहे. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची गाडी फिरकलेली नसल्याने रुग्णालय परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे परिसरात तीव दुर्गंधी पसरली असून, रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Pune Hospital Biomedical Waste
Sugar Control Order: ऊस नियंत्रण आदेश 2026 मध्ये सुधारणा; साखर उद्योगाच्या महत्त्वाच्या मागण्या

महापालिकेचे मध्यवर्ती आणि गजबजलेले रुग्णालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमला नेहरू रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, गेल्या चार दिवसांपासून येथे साचलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आलेली नाही. सलाईनच्या बाटल्या, वापरलेल्या सुया, कापूस, प्लास्टिक साहित्य आणि इतर धोकादायक वैद्यकीय कचरा उघड्यावर पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Pune Hospital Biomedical Waste
Sugar Export Ban: साखर निर्यात बंदीवर फेरविचाराची मागणी; उद्योग संकटात जाण्याची भीती

या कचऱ्यातून सुटणाऱ्या उग््रा वासामुळे रुग्णालय परिसरात थांबणेही कठीण झाले आहे. विशेषतः दवाखान्यातील वॉर्ड परिसरापर्यंत दुर्गंधी पोहोचत असल्याने उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजारांवरील रुग्णांना या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

Pune Hospital Biomedical Waste
Junnar Crime: जुन्नरमध्ये खळबळ; विवाहितेचा खून करून आत्महत्येचा बनाव, पती ताब्यात

दरम्यान, कचरा उचलण्याचे कंत्राट असलेल्या संस्थेची गाडी चार दिवस का आली नाही, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. एवढा कचरा साचत असतानाही रुग्णालय प्रशासनाने तत्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहर स्वच्छतेचे दावे केले जात असताना महापालिकेच्या स्वतःच्या रुग्णालयातच अशी अवस्था निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आम्ही उपचारासाठी आलो आहोत की आणखी आजार घेऊन जाण्यासाठी?” असा संतप्त सवाल एका रुग्णाच्या नातेवाईकाने उपस्थित केला. या निष्काळजीपणामुळे भविष्यात एखादी गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

Pune Hospital Biomedical Waste
PMPML Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा पीएमपीला झटका; महिन्याला 5.40 लाखांचा वाढीव भार

आयुक्तांच्या आदेशानंतर झाली स्वच्छता

कमला नेहरू रुग्णालयात साचलेल्या या कचऱ्याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार करण्यात आली. आयुक्त राम यांनी याची दखल घेत आरोग्य विभाग व घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावत चार दिवसांनंतर हा कचरा साफ करून घेण्यास सांगितले. आयुक्तांच्या आदेशांतर अर्ध्या तासात कचरागाड्या आल्या आणि त्यांनी कचरा उचलून नेला.

हा कचरा मेडिकल वेस्ट नव्हता : आरोग्यप्रमुखांचे अजब उत्तर

याबाबत महापालिकेच्या आरोग्यप्रमुख निना बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कमला रुग्णालयातील हा कचरा ओला व सुका कचरा होता, तो वैद्यकीय कचरा नव्हता, असे सांगितले. घनकचरा विभागाची गाडी खराब झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलला गेला नव्हता. पण आज कचरा उचलला आहे. तसेच नियमित गाडी पाठवावी असे पत्र घनकचरा विभागाच्या उपायुक्तांना पाठविण्यात आले आहे, असे बोराडे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news