Lavani Censor Board Demand: लावणी व लोककलांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डची मागणी

अश्लील सादरीकरणांवर नियंत्रणासाठी कलाकारांची हाक; पारंपरिक कलेचे जतन करण्यावर भर
Ankle bells
Ankle bellsPudhari
Published on
Updated on

पुणे: ‌‘सध्या लावणीच्या नावाखाली किंवा डीजे नृत्य, रंगमंच सादरीकरणाच्या नावाने अश्लील सादरीकरणे होत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे लावणी कलाकार आणि लोककलाकारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Ankle bells
Pune Hospital Biomedical Waste: कमला नेहरू रुग्णालयात कचऱ्याचा ढीग; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्धार कलाकारांनी रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी काँग््रेास चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले होते.

Ankle bells
Sugar Control Order: ऊस नियंत्रण आदेश 2026 मध्ये सुधारणा; साखर उद्योगाच्या महत्त्वाच्या मागण्या

ज्येष्ठ कलाकार लावणी मंगला बनसोडे, बरखा जळगावकर, अप्सरा जळगावकर, राजश्री काळे, वनमाला बागूल, संगीत बारी (कला केंद्र) असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जाधव, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे प्रदेश सचिव मोहित नारायणगावकर, अखिल महाराष्ट्र लोककलावंत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नारायण जावळेकर, शिवाजी जावळेकर उपस्थित होते.

Ankle bells
Sugar Export Ban: साखर निर्यात बंदीवर फेरविचाराची मागणी; उद्योग संकटात जाण्याची भीती

मंगला बनसोडे म्हणाल्या, मध्यंतरी डीजेच्या तालावर नृत्य सुरू झाले. त्याचा परिणाम पारंपरिक लोककलेवर होत आहे. राज्य सरकारने सेन्सॉर बोर्ड स्थापन करून पारंपरिक लोककलेला नवसंजीवनी प्राप्त करून द्यावी. तर आता व्यावसायिक

Ankle bells
Junnar Crime: जुन्नरमध्ये खळबळ; विवाहितेचा खून करून आत्महत्येचा बनाव, पती ताब्यात

स्पर्धेतून लावणीचे मूळ स्वरूप बदलताना दिसत आहे. आधुनिकतेला विरोध नाही, पण परंपरेचा आत्मा जपला गेला पाहिजे, असे बरखा आणि अप्सरा जळगावकर म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news