

लोक जागर आशिष देशमुख
प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी
जुने वाडे, वाहतूक कोंडीने नागरिक बेजार मलनिस्सारण, सांडपाणी योजना नाही; नागरिकांचे आरोग्यच धोक्यात शहरातील सर्वांत जुना भाग म्हणजे प्रभाग क्रमांक २६ आहे. पूर्वी हा प्रभाग क्रमांक १८ होता. नव्या रचनेत तो २६ झाला. दाट लोकवस्ती या भागात आहे. अरुंद रस्ते आणि कालौघात पिण्याचे पाणी, सांडपाणी, मलनिस्सारण योजना यांचे नीट व्यवस्थापन नियोजन करण्यात महापालिकेला अपयश आले, असेच म्हणावे लागेल इतकी गंभीर अवस्था या प्रभागाची आहे.(Latest Pune News)
पुणे म्हणजे देशातील सर्वांत चांगले. सर्व चांगल्या सोयी-सुविधा असणारे शहर अशीच देशात चांगली प्रतिमा आहे. मात्र, शहरातील काही प्रभाग जुने वाडे, पडके वाडे, अरुंद रस्ते, त्यामुळे सततची वाहतूक कोंडी, मलनिस्सारणासह सांडपाणी योजना नीट नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. देशात सर्वांत सुंदर अन् राहण्यालायक, अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात अशीही एक वसाहत असेल हे सांगून खरे वाटणार नाही. असेच वर्णन प्रभाग क्रमांक २६ चे करता येईल. महापालिका निवडणुकांचे पडघम वाजताच नागरी समस्या प्रकपनि नागरिक आता धाडसाने मांडू लागले आहेत. गत चार वर्षात वार्डात, प्रभागांना नगरसेवक अन् शहराला महापौर नसल्याने बहुतांश प्रभागांतील विकासकामे रखडल्याची ओरड होत आहे.
प्रभागातील मुख्य भाग : (घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, समताभूमी) गोटीराम काची मंडई, स्वारगेट, कस्तुरे चौक, पालखी विठोबा चौक, रामोशी गेट, बागवे कमान, मोठा गणपती, एकबोटे कॉलनी, जय जवान मित्रमंडळ, किराड आळी, सेव्हन लव्ह हॉटेल इ. (मराठा समाज, मारवाडी, गुजराती, मातंग समाज, माळी समाज, परदेशी, भोई, किराड, लोधी, डाळ वाले, मिठाईवाले, होळकर, मलाव, घोडेवाले, विडी कामगार, सफाई कामगार)
या प्रभागात फिरताना जनतेचा प्रचंड रोष पाहावयास मिळाला. तेथे अनेक प्रकारची मत-मतांतरे दिसली ती पुढीलप्रमाणे
आजवर हिंदूंची लोकसंख्या जास्त असूनही उमेदवारांत मतविभागणी मोठ्या प्रमाणावर होते. ज्या उमेदवारास मुस्लिम मते मिळत तोच थोड्या फरकाने निवडून येत असे. हा प्रभाग गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होता. मात्र, काही जाणकारांच्या मते दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी मुस्लिम मतदारांची चांगली मोट बांधली.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभागातील भाजपचे चारही उमेदवार निवडून आले.
काही जाणकारांच्या मते भाजपने जुन्या कार्यकत्यांना डावलून आयारामांना संधी दिल्याने त्यांच्यावर अन्याय झाला ती सल अजूनही आहे.
शौचालयाची कामे, जुन्या ड्रेनेजलाइन दुरुस्त, रस्त्यांची रखडलेली कामे, पाणीलाइन, पादचारी मार्ग पूर्ण केले. महिला बचत गटांना शिवणवर्ग, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, केटरिंग क्लासेस, रोजगाराभिमुख उपक्रम, बेटी बचाव बेटी पाढओ मोहीम जागृती, सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन लावल्या. तरुणींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण दिले.
अरुंद राहते. सतत वाहतूक कोंडी, अस्वच्छता, जुने वाडामालक आणि भाडेकरूचे वाद सोडवता आले नाही.
महापालिकेच्या एकूण सहा शाळांपैकी दोन शाळा कायमच्या बंद, त्यामुळे स्मार्ट शिक्षणापासून प्रभाग दूर, पिण्याचे पाणी अन मलनिस्सारण लाइन काही भागात एकत्र गेल्याने आरोग्याचे सतत गंभीर प्रश्न
सर्वच स्प्त्यावर अतिक्रमणे वाढली, त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी वाढली.
जुनी वस्ती, जुने वाडे असल्याने इथे काम करणे खूप मोठे आव्हान होते. मात्र, कोरोनाची लाट आल्याने ठरवलेली कामे पूर्ण करता आली नाहीत, याची खंत आहे. तरी महिलांसाठी मी अनेक कामे केली आहेत. शिवणकाम वर्ग, नोकरीसाठी प्रशिक्षण वर्ग, आरोग्य सुविधा, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला.
आरती कोंढरे, माजी नगरसेविका
कोरोनाची लाट आल्याने दोन वर्षे विकासकामे झाली नाहीत. त्यापुढे नगरसेवकपदाचा कालावधी संपला. तरीही ना उमेद न होता जनतेच्या कामात स्वतःला झोकून दिले. रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन यावर खूप कामे केली.
सम्राट थोरात, माजी नगरसेवक
आम्ही दोघांनी जनतेची अनेक चांगली कामे केली. यात फुलेवाडा स्वच्छतेचे मोठे काम केले. सावित्रीबाई फुले स्मारक उभे केले. महिला कल्याण योजना केल्या, मनपाच्या चतुर्थश्रेणी कामगारांना २२१ फ्लॅट योजना केली. पालखी विठोबा मंदिर परिसरात वारकरी भवनासह शौचालयाची सुविधा केली.
विष्णू हरिहर, विजयालक्ष्मी हरिहर माजी नगरसेवक
प्रभागात पंतप्रधान मोर्दीच्या सर्वच योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या. यात उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजनांचा समावेश आहे. तसेच आयटी, आकांक्षा फाउंडेशनच्या साहाय्याने शालेय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणे सुरू आहे.
अजय खेडेकर माजी नगरसेवक
मी साठ वर्षांपासून याच भागात राहतो. मी डॉक्टर असून, माझे वडील पंधरा वर्षे नगरसेवक होते. ते अपक्ष होते. त्यांचा सत्कार तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी केला. मात्र, मला दरवेळी डावलले गेले.
डॉ. गणेश परदेशी, नागरिक
या प्रभागात खूप समस्या आहेत. जागरूक नागरिक या नात्याने मी समस्या मांडत असतो. ड्रेनेज साफ करणाऱ्या दीड कोटी रुपयांच्या मशिन घोरपडे उद्यानात दोन वर्षांपासून पडून होत्या. व्हिडीओ व्हायरल होताच त्या महापालिकेने तिथून उचलून नेल्या.
रूपेश केसेकर, नागरिक