

पुणे : पुण्यातील वैद्यकीय निदान क्षेत्रात रेडिओलॉजी विभागात मोठी झेप घेतली गेली आहे. अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानामुळे रुग्णसेवा अधिक वेगवान, अचूक आणि सुरक्षित बनली आहे. जगातील नवीम इमेजिंग यंत्रणेच्या प्रवेशामुळे रेडिओलॉजी सेवेचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्यामुळे गंभीर आजारांचे निदान अचूक व जलद करणे शक्य झाले आहे.(Latest Pune News)
दक्षिण आशियातील पहिला 1152-स्लाइस सीटी स्कॅनर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे. या यंत्रामुळे अतिशय कमी वेळेत अत्यंत स्पष्ट प्रतिमा मिळतात. हृदयाच्या सीटी स्कॅनसाठी रुग्णांना पूर्वी औषध देऊन हृदयाचे ठोके कमी करावे लागत होते, मात्र या स्कॅनरमुळे आता 130 ते 140 ठोके प्रति मिनिट या वेगानेही स्कॅन करता येतो. त्यामुळे प्रक्रिया वेगवान आणि ताणमुक्त झाली आहे.
लहान मुलांसाठीही ही प्रणाली विशेष उपयुक्त ठरत आहे. पारंपरिक स्कॅनसाठी भूल द्यावी लागत असे, मात्र अल्ट्रा-फास्ट इमेजिंगमुळे आता बाळांचाही स्कॅन भूल न देता करता येतो. यामुळे रुग्ण आणि पालकांना अधिक सुरक्षिततेचा अनुभव मिळतो. याशिवाय, या यंत्रात 50 टक्क्यांनी कमी कॉन्ट्रास्ट डाय वापरली जाते, ज्यामुळे मूत्रपिंडांवरील ताण कमी होतो.
नव्या तंत्रज्ञानामुळे मेंदू, पाठीचा कणा, स्नायू आणि यकृताशी संबंधित आजारांचे अचूक निदान करता येते. स्कॅन जलद झाल्याने भूल देण्याची गरज कमी झाली असून, संपूर्ण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि रुग्णकेंद्री बनली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, एआयची जोड आणि रुग्णकेंद्री दृष्टिकोन यांच्या एकत्रित परिणामामुळे पुण्यातील रेडिओलॉजी आता नव्या उंचीवर पोहचली आहे.
भारतातील पहिली फिलिप्स इंजेनिया इव्होल्युशन प्रणाली स्मार्ट स्पीड एआयसह रुबी हॉल क्लिनिकमध्ये सुरू करण्यात आली आहे. एआयच्या साहाय्याने 30 मिनिटांचा एमआरआय स्कॅन आता 10 मिनिटांत पूर्ण होतो. रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि ट्रस्टी डॉ. सायमन ग््राँट तसेच जनरल मॅनेजर (स्ट्रॅटेजी आणि बिझनेस डेव्हलपमेंट) सुश्री नताली ग््राँट नंदा यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.
डॉ. प्रणव महादेवकर, कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट आणि विभागप्रमुख, रुबी हॉल क्लिनिक