Avasari Pimpalgaon ZP election: अवसरी-पिंपळगाव गटात इच्छुकांमध्ये चुरस वाढली

गट ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांमध्ये स्पर्धा
अवसरी-पिंपळगाव गटात इच्छुकांमध्ये चुरस वाढली
अवसरी-पिंपळगाव गटात इच्छुकांमध्ये चुरस वाढलीPudhari
Published on
Updated on

संतोष वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक-पिंपळगाव जिल्हा परिषद गट ओबीसी (मागास प्रवर्ग) साठी राखीव झाल्यामुळे राजकीय समीकरणात मोठा बदल घडला आहे. या गटासाठी याआधी सर्वसाधारण श्रेणीत तयारी करणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे; मात्र आरक्षणाच्या बदलानंतर आता ओबीसी समाजातील इच्छुकांच्या आशा पुन्हा उजळल्या असून, नव्या उमेदवारांनी तयारीचा बिगुल फुंकला आहे.(Latest Pune News)

अवसरी-पिंपळगाव गटात इच्छुकांमध्ये चुरस वाढली
Pait Ambethan Zilla Parishad Election: पाईट–आंबेठाण गटात चौरंगी लढतीची चिन्हे; बुट्टे पाटील विरुद्ध बुट्टे पाटील सामना?

अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मानणाऱ्या अनेक गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गटात राष्ट्रवादीचा प्रभाव नेहमीच लक्षणीय राहिला आहे; मात्र आता आरक्षण बदलामुळे नव्या समीकरणांची निर्मिती होत असून, विविध पक्षांच्या नेत्यांनी या गटात योग्य उमेदवार देण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. काही इच्छुकांनी तर निवडणुकीपूर्वीच ओबीसी जातीचे दाखले काढून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. योगायोगाने हे आरक्षण ओबीसीसाठी जाहीर झाल्याने त्यांचे राजकीय गणित जुळले आहे.

अवसरी-पिंपळगाव गटात इच्छुकांमध्ये चुरस वाढली
Pimpri Pendhar Leopard CCTV: पिंपरी पेंढारमध्ये खडकमाळ परिसरात तिन्ही बिबट्यांची वर्दळ; नागरिकांत भीतीचे वातावरण

अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक आणि पिंपळगाव ही या मतदारसंघातील प्रमुख आणि मोठ्या लोकसंख्येची गावे असून, येथील राजकीय चढाओढ नेहमीच रंगतदार राहिली आहे. या गावांतील मतदारसंख्या इतर छोट्या गावांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे निवडणुकीची मदार याच गावांवर अवलंबून असते. त्यामुळे उमेदवार कोणत्याही गावातून असला तरी अवसरी खुर्द आणि पिंपळगावचा पाठिंबा मिळविणे हे विजयाचे मुख्य सूत्र मानले जाते. सध्या या मतदारसंघात काही महिला तसेच पुरुष इच्छुकांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गाठीभेटी, संपर्क मोहीम आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षांतर्गत समन्वय, जातीगत समीकरण आणि स्थानिक लोकप्रियता या तिन्ही बाबींचा विचार करून उमेदवार ठरविण्यात येणार आहे.

या गटात अनेक पक्षांचे नेते आपापल्या पातळीवर सक्रिय झाले आहेत. येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा) तसेच काँग्रेस आय या सर्व पक्षांचे नेते रस दाखवत आहेत. त्यामुळे अवसरी-पिंपळगाव गटाची निवडणूक रंगतदार होणार असून, कोणत्या पक्षाचा उमेदवार अंतिम फेरीत पोहचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवसरी-पिंपळगाव गटात इच्छुकांमध्ये चुरस वाढली
Ambegaon Junnar Leopard Attack: ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!’ — आंबेगावात शेतकऱ्याचा थरार; जुन्नरमध्ये तरुणावर बिबट्याचा हल्ला

मागील निवडणुकीतील आकडेवारी

सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत या गटाचे नाव मंचर-अवसरी खुर्द जिल्हा परिषद गट असे होते. त्यानंतर मंचर नगरपंचायतीची स्थापना झाली. सद्य:स्थितीत मंचर नगरपंचायत झाल्यामुळे मंचर शहर जिल्हा परिषद गटातून वगळण्यात आले. सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत या गटात अरुणा थोरात 12 हजार 486 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. अन्य उमेदवारांमध्ये अल्लू इनामदार 675, अनिता इंदोरे 117, वैशाली बाणखेले 1 हजार 61, तर प्रज्ञा भोर यांना 10 हजार 183 मते मिळाली होती.

इच्छुक उमेदवारांची नावे

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आणि तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, अवसरी खुर्द गावचे माजी सरपंच जगदीश अभंग, शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीने जिल्हा अध्यक्ष सुरेश भोर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्योजक प्रशांत अभंग इत्यादी नावे चर्चेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news