Pune Fuel Shortage: पुण्यात स्मशानभूमी बंद, पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता; पंपचालकांना तेल कंपन्यांचा इशारा

Pune Fuel Shortage: पश्चिम आशियातील युद्धामुळे पुण्यात इंधन टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना आगाऊ पैसे भरल्यानंतरच इंधन पुरवठा करण्याचा इशारा दिला आहे.
Pune Fuel Shortage Alert
Pune Fuel Shortage AlertPudhari
Published on
Updated on

Pune Fuel Shortage Alert: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य तणावाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचे थेट परिणाम महाराष्ट्रात, विशेषतः पुणे शहरात जाणवू लागले असून येत्या काही दिवसांत इंधन टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल पंपचालकांना तेल कंपन्यांचा इशारा

पुण्यातील अनेक पेट्रोल पंपचालकांना तेल कंपन्यांकडून मेसेज पाठवण्यात आले आहेत. या मेसेजमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आगाऊ रक्कम जमा करण्यास सांगितले आहे. यापूर्वी पंपचालकांना सात ते आठ दिवसांचे क्रेडिट दिले जात होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांनी ही सवलत थांबवली असून आधी पैसे भरल्याशिवाय इंधन मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पुढील काळात इंधनाच्या पुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गॅस आणि सीएनजी पुरवठ्यावरही परिणाम

कालपासूनच पुण्यात सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Pune Fuel Shortage Alert
Middle East Flight Disruption|प्रवाशांच्‍या सुरक्षेला सर्वोच्‍च प्राधान्‍य; 'एमिरेट्स'ची दुबईला जाणारी विमान उड्डाणे स्थगित

वाढत्या दरांमुळे गृहिणींची चिंता

घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महिलांचे म्हणणे आहे की, गॅस, पेट्रोल, डिझेल आणि किराणा माल यांचे दर सतत वाढत आहेत; मात्र उत्पन्न त्याच प्रमाणात वाढत नाही. गॅस एजन्सीकडे वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारीही काही नागरिकांनी केल्या आहेत.

हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम

कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत अचानक १५० ते २०० रुपयांनी वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा पुरवठा अनियमित झाला आहे. त्यामुळे व्यवसाय सुरळीतपणे चालवणे कठीण होत असल्याचे हॉटेल मालक सांगत आहेत. गॅस पुरवठा कधी सुरळीत होईल याबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे उद्योग क्षेत्रातही चिंतेचे वातावरण आहे.

स्मशानभूमीतही अडचणी

गॅस टंचाईचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. सदाशिव पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. गॅस पुरवठा थांबल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या दाहिन्या वापरात नाहीत.

Pune Fuel Shortage Alert
T20 World Cup Prize Money: T20 वर्ल्ड कप विजेत्यांवर पडणार पैशांचा पाऊस; पराभूत संघाला काय मिळणार?

पुढील काही दिवस महत्त्वाचे

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर दबाव वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिली, तर इंधनाच्या दरात वाढ आणि पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक साठा न करता संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

एकूणच, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम स्थानिक पातळीवर कसा जाणवू शकतो, याचे उदाहरण सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news