T20 World Cup Prize Money: T20 वर्ल्ड कप विजेत्यांवर पडणार पैशांचा पाऊस; पराभूत संघाला काय मिळणार?

T20 World Cup Prize Money: टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला सुमारे २७.५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या संघाला सुमारे १४.६७ कोटी रुपये मिळणार आहेत.
T20 World Cup Prize Money
T20 World Cup Prize MoneyPudhari
Published on
Updated on

T20 World Cup Prize Money: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धांपैकी एक असलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघांना बक्षिसांच्या रूपात मोठी रक्कम मिळणार आहे.

विजेत्या संघासाठी कोट्यवधींचे बक्षीस

या वर्षीच्या टी-२० विश्वचषकात विजेत्या संघासाठी तब्बल ३ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २७.५ कोटी रुपयांचे बक्षीस असणार आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला ही रक्कम दिली जाणार आहे. तर उपविजेत्या संघालाही मोठी बक्षीस रक्कम मिळणार असून त्यांना १.६ मिलियन डॉलर, म्हणजेच सुमारे १४.६७ कोटी रुपये मिळणार आहेत.

उपांत्य फेरीतील संघांनाही मोठे बक्षीस

या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचलेल्या पण अंतिम फेरीत प्रवेश न मिळवू शकलेल्या संघांनाही चांगली आर्थिक रक्कम मिळणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ०.७९ मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ७.२४ कोटी रुपये दिले जाणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा पराभव झाला होता.

इतर संघांसाठीही आर्थिक प्रोत्साहन

आयसीसीने या स्पर्धेतील सर्व संघांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी प्राइज मनीची विभागणी विविध टप्प्यांनुसार केली आहे. स्पर्धेत पाचव्या ते बाराव्या स्थानावर राहणाऱ्या संघांना प्रत्येकी ०.३८ मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ३.४८ कोटी रुपये मिळणार आहेत.

त्याचप्रमाणे तेराव्या ते विसाव्या स्थानावर राहणाऱ्या संघांसाठी प्रत्येकी ०.२५ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २.२९ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.

T20 World Cup Prize Money
ind vs nz final: भारत X न्यूझीलंड T20 लढतींचा रिपोर्ट कार्ड वाचा, अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर 2023 ला काय घडलेलं?

विक्रमी बक्षीस

यंदाच्या टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीने एकूण १३.५ मिलियन डॉलर बाजूला काढून ठेवले आहेत. भारतीय रुपयांत याची किंमत सुमारे १२३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे ही रक्कम मागील विश्वचषकाच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी जास्त आहे.

२०२४ च्या टी-२० विश्वचषकात आयसीसीने एकूण ११.२५ मिलियन डॉलरची (९४ कोटी रुपये) बक्षीस रक्कम वितरित केली होती. त्या वेळी विजेता असलेल्या भारतीय संघाला २.४५ मिलियन डॉलर (२२ कोटी रुपये) तर उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाला १.२८ मिलियन डॉलरची (११ कोटी रुपये)  बक्षीस रक्कम मिळाली होती.

T20 World Cup Prize Money
T20 World Cup Final: कुलदीप In, वरुण Out... वर्ल्ड कप फायनलसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन बदलणार; अभिषेकचं काय होणार?

टी-२० क्रिकेटची वाढती लोकप्रियता

टी-२० क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या स्पर्धेची व्यावसायिक किंमतही सातत्याने वाढत आहे. जगभरात टी-२० क्रिकेटला मोठा प्रेक्षकवर्ग मिळत असल्यामुळे प्रसारण हक्क, प्रायोजकत्व आणि जाहिरातींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत आहेत. याच कारणामुळे टी-२० विश्वचषकाची बक्षीस रक्कमही दरवेळी वाढताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news