

पुणे : पर्यटन कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेने अनुभव प्रमाणपत्र न दिल्याने, तसेच तिला देण्यात आलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, वर्षभरानंतर याप्रकरणी पर्यटन कंपनीच्या संचालकांविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना 8 फेबुवारी रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कमलग््राीन सोसायटी किरकीटवाडी येथे घडली होती.
अश्विनी सचिन जोशी (वय 46, रा. जोशी अपार्टमेंट, हिंगणे खुर्द) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे, तर याबाबत जीवन जगन्नाथ हेंद्रे (वय 58, रा. लगड मळा, धायरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत पती सचिन जोशी (वय 51) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेंद्रे यांची लाईफलाईन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. या कंपनीत अर्श्विनी जोशी 2011 ते 2024 पर्यंत नोकरीस होत्या. या काळात त्यांनी चार ते पाच वेळा काम सोडले होते. दरम्यान, जोशी यांना कर्वेनगर भागातील एका पर्यटन कंपनीत नोकरी लागली. तेथे त्या रुजू झाल्या. जोशी यांनी हेंद्रे यांच्याकडे अनुभव प्रमाणपत्र मागितले होते. मात्र, हेंद्रे यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले नाही. जोशी कर्वेनगरमधील कंपनीत काम करत होत्या. हेंद्रे यांनी संबंधित कंपनीच्या संचालकांची भेट घेऊन जोशी यांना कामावर ठेवू नका, असे सांगितले होते. त्यानंतर जोशी यांनी कर्वेनगरमधील कंपनीतील नोकरी सोडली.
हेंद्रे यांच्या त्रासाला कंटाळून अर्श्विनी यांनी गेल्या वर्षी 8 फेबुवारी रोजी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद त्यांचे पती सचिन यांनी नुकतीच पोलिसांकडे दिली. अश्विनी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार करून ठेवला होता. तो व्हिडीओ त्यांच्या पतीला मिळाला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, जीवन हेंद्रे याच्यामुळे आत्महत्या करत आहे. त्यानंतर अर्श्विनी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हेंद्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.
पुणे : कुख्यात टिपू पठाण सोबतच्या मोक्काच्या गुन्ह्यात वाँटेड आरोपीने कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीट परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सादीक हुसेन कपुर (56, रा. सय्यदनगर, हडपसर) असे मृताचे नाव आहे. सादीकने आत्महत्या करण्यापूर्वी 30 ते 33 पांनाची सुसाईड नोट लिहली असून, त्यामध्ये एका माजी नगरसेवकाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली.
सादीकचा ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत 28 क्रमांकाचा गाळा आहे. तेथे त्याचे ऑफीस होते. ऑफीसमध्येच त्याने पंख्याला गळफास घेतला. याची माहिती लष्कर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सादीकला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टिपू पठाण हडपसर परिसरातील कुख्यात गुंड असून, तो सध्या मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. सादीकवर देखील मोक्काअंतर्गत कारवाई झाली होती. त्यामध्ये तो फरार होता. अशातच त्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान त्याने माजी नगरसेवकाच्या नावासह अन्य काही जणांच्या नावाचा उल्लेख केल्याची माहिती आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली असून, त्याची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.