

बाणेर : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत बाणेर-बालेवाडी-पाषाण - सोमेश्वरवाडी-सुतारवाडी - सुस - म्हाळुंगे या प्रभाग क्रमांक 9 मधील एक प्रबळ उमेदवार म्हणजे जयेश संजय मुरकुटे. सर्वात तरुण, उच्चशिक्षित असलेले मुरकुटे निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी शरद पवार गटातून उतरले आहेत.
जयेश मुरकुटे हे गेल्या चार वर्षांपासून बाणेर बालेवाडी परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील उपक्रम राबवत आहेत. त्याचबरोबर प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, धोकादायक फांद्या, कचरा इत्यादी नागरी समस्या प्रकर्षाने मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
केवळ समस्या न मांडता त्यावर उपाययोजना म्हणून काही ठिकाणी स्वखर्चातून तर काही ठिकाणी महापालिका प्रशासनाशी वारंवार संवाद साधून आणि पाठपुरावा करत या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
मान्सून सेफ्टी ड्राईव्ह या माध्यमातून पावसाळ्या दरम्यान साठणारे पाणी, धोकादायक खड्डे, विजेची तार, धोकादायक आणि वाकलेले इलेक्ट्रिक पोल, धोकादायक झाड आणि झाडाच्या फांद्या याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत त्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता.
याचबरोबर प्रभागातील रस्त्यांची समस्या मांडत महापालिकेने प्रभागातील रस्त्यांवर केलेला खर्च, त्याच्या कामाची गुणवत्ता, आणि त्याची आजची अवस्था याबाबत सतत जनजागृती करत निधीचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर झाल्याचे उघडकीस आणले होते.
त्याचप्रमाणे भष्टाचार, सुस म्हाळुंगे टाऊन प्लॅनिंगचा प्रश्न, डीपी रस्त्यांची चुकलेली अलाइनमेंट, लाखो रुपये खर्चून बंद अवस्थेत असलेली भाजी मंडई, अग्निशामक केंद्र असे मोठे आणि अभ्यासपूर्ण मुद्दे त्यांनी आपल्या चर्चेत आणले.
मॅरेथॉन स्पर्धा, दहीहंडी महोत्सव, पर्यावरण पूरक गणपती विसर्जन घाट, फिरता विसर्जन हौद, मोफत जंतुनाशक फवारणी, बाणेर येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, पथदिवे आणि चेंबर दुरुस्ती, बंद पडलेला शेतकरी आठवडी बाजार सुरू करणे, दिवाळी पहाट, आरोग्य तपासणी शिबिर, बारा महिने मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, पूरग््रास्तांना तातडीने मदत, तसेच सोसायटीमध्ये आधार-पॅन-मतदान कार्ड शिबिर यासारखी अनेक कामे गेल्या चार वर्षात सातत्याने करत आले आहेत. प्रभागातील सर्व नागरिकांनी याबाबत वेळोवेळी प्रोत्साहन देत कामाचे कौतुकही केले आहे, अशी प्रतिक्रिया जयेश मुरकुटे यांनी व्यक्त केली.