मी मोशीवरून वडिलांना घेऊन औंध रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी आलो आहे. घराजवळील खासगी रुग्णालयाने 8000 रुपये खर्च सांगितला. ससूनमध्ये खूप गर्दी असल्याने तीन-चार दिवसांनी या, असे सांगितले. जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार सुरू झाल्याने एमआरआय तपासणी मोफत होईल, असे वाटले होते. पण, त्यासाठीही पैसे भरावे लागणार आहेत. गरीब रुग्णांकडे लक्ष द्यायला सरकारला कधी वेळ मिळेल?– सोपान कांबळे,रुग्णाचे नातेवाईकपीपीपी तत्त्वावरील कंपनीने नोटीस देऊनही अद्याप स्वत:ची सेवा बंद केलेली नाही. याबाबत आरोग्य विभागाला कळवण्यात आले आहे. सध्या रुग्णालयामध्ये रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्सरे या चाचण्या मोफत आहेत. शासनाने आदेश दिल्यावर इतर तपासण्याही मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.– डॉ. नागनाथ यमपल्ले,जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा