Pune Ganeshotsav : असे असणार पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे देखावे | पुढारी

Pune Ganeshotsav : असे असणार पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे देखावे

पुणे; पुढारी वृत्तसेवा :  कोणी चंद्रयान मोहिमेवरील देखावा साकारत आहे, तर कोणी चिनाब नदीवर साकारण्यात येणार्‍या रेल्वे पुलावरील हलता देखावा साकारत आहे… गणेशोत्सवात यंदा वैविध्यपूर्ण विषयांवरील देखाव्यांचा नजराणा पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. मध्यवर्ती पेठांसह उपनगरातील काही भागात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय विषयांवरील जिवंत देखाव्यांची संख्या यंदा जास्त असून, विविध मंदिरे, वाडे, तीर्थस्थळे आणि प्रेक्षणीय स्थळांच्या भव्य प्रतिकृतीही साकारण्यात येत आहेत. ‘तृतीयपंथीय समाजाचा एक घटक’पासून ते ‘मोबाईलचे दुष्परिणाम’ यापर्यंत विविध सामाजिक विषयांवरील देखावेही पुणेकरांना पाहता येणार आहेत.

मंडळे साकारताहेत हे देखावे

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचे गर्भगृह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेला कॉरिडॉर आणि कमान 
 • श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट – ओंकार महल
 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट -राम मंदिराची प्रतिकृती
 • अखिल मंडई मंडळ – स्वामी दरबार देखावा
 • हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट – चारधामवरील देखावा
 • सेवा मित्र मंडळ (शुक्रवार पेठ) : संस्कार आणि संस्कृतीवर आधारित जिवंत देखावा आणि किल्ले रायगडाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती
 • अकरा मारुती कोपरा सहायक जय भारत मित्रमंडळ (शुक्रवार पेठ) – अकरा मारुती दर्शन देखावा
 • लाकडी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – चंद्रयान-3 मोहिमेवरील हलता देखावा
 • हिराबाग मित्रमंडळ – आदियोगी शंकर यांच्यावर
 • आधारित थ—ीडी मॅपिंग प्रोजेक्शन -सिस्टीमद्वारे देखावा
 • मंगल क्लब (गुरुवार पेठ) – सीताहरण या हलत्या देखाव्यात जटायूशी युद्धाचा थरार
 • नातूबाग मंडळ ट्रस्ट (बाजीराव रस्ता) – बालाजी गणेश मंदिराची प्रतिकृती आणि विद्युत रोषणाई
 • शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट – चिनाब नदीवर साकारण्यात येणारा जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलावरील हलता देखावा
 • नागनाथपार सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट – सप्तकोटेश्वर मंदिराची प्रतिकृती
 • खजिना विहीर तरुण मंडळ – पृथ्वी प्रदक्षिणेवर आधारित हलता देखावा
 • निंबाळकर तालीम मंडळ ट्रस्ट (सदाशिव पेठ) – गंगा अवतरण यावरील हलता देखावा
 • श्री सुंदर गणपती तरुण मंडळ (रविवार पेठ) – लोकमान्य टिळक यांच्या काळातील गणेशोत्सव यावर आधारित जिवंत देखावा
 • वीर हनुमान मित्र मंडळ (बुधवार पेठ) – तृतीयपंथीय हेही समाजाचा एक घटक यावरील देखावा
 • अंकुश मित्र मंडळ ट्रस्ट (मार्केट यार्ड) – श्री दत्त जन्मावरील हलता देखावा
 • आपला मारुती मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव (गुरुवार पेठ) – सीता जन्मावरील देखावा
 • छत्रपती राजाराम मंडळ (सदाशिव पेठ) – शेगाव तीर्थक्षेत्रावरील देखावा
 • पेरूगेट चौक मित्र मंडळ ट्रस्ट – हिंदवी स्वराज्यावरील जिवंत देखावा
 • अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ (सदाशिव पेठ) – सद्गुरू शंकर महाराजांवरील चलचित्र देखावा
 • साईनाथ मंडळ ट्रस्ट (बुधवार पेठ) – नरसिंह अवतारावर आधारित जिवंत देखावा
 • त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव, पुणे – कार्ला येथील एकवीरादेवी मंदिराची आणि लेण्यांची प्रतिकृती
 • साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर – चंद्रयान-3 मोहिमेवरील देखावा
 • भोलेनाथ मंडळ (नारायण पेठ) – शिवशंकराचे काल्पनिक मंदिर आणि विद्युत रोषणाई
 • नवग्रह तरुण मंडळ (कसबा पेठ) -सुवर्ण मंदिराचा देखावा
 • श्रमदान मारुती मंडळ (गुरुवार पेठ) -विद्युत रोषणाईचा देखावा
 • खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – गणेश महालची प्रतिकृती
 • उल्हास मंडळ (गुरुवार पेठ) -काल्पनिक मंदिराची प्रतिकृती
 • श्री काळभैरवनाथ तरुण मंडळ (लक्ष्मी रस्ता) – सौरऊर्जेचा शास्त्रीय देखावा
 • माती गणपती मंडळ (नारायण पेठ) – अफजल खानाचा वध यावरील जिवंत देखावा
 • कडबेआळी मंडळ (बाजीराव रस्ता) – रायगड किल्ल्याची प्रतिकृती
 • श्री पोटसुळ्या मारुती मंडळ (गणेश पेठ) – ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ : निर्भीड पत्रकारिता’ या विषयावरील देखावा
 • अरण्येश्वर मित्रमंडळ गवळीवाडा ट्रस्ट – राजकारणाचे झाले वस्त्रहरण यावरील देखावा
 • हनुमान मित्र प्रतिष्ठान (लोखंडे तालीम, नारायण पेठ) – ‘मोबाईल शाप की वरदान’ यावरील हलता देखावा
 • गोखले स्मारक चौक मित्रमंडळ -काल्पनिक मंदिराचा देखावा
 • संयुक्त प्रसाद मित्रमंडळ (नारायण पेठ) – पूजेच्या 27 प्रकारच्या साहित्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्रतिकृती
 • हिंद तरुण मंडळ (बाबाजान चौक) – अजित डोवाल यांची गुप्तचर खात्यातील कारर्कीद – इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी या विषयावर देखावा
 • सुयोग मंडळ (गोखलेनगर)- चंद्रयान-3

Back to top button