Jawan : भाजपचा काँग्रेसवर निशाणा, भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी मानले शाहरुखचे आभार | पुढारी

Jawan : भाजपचा काँग्रेसवर निशाणा, भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी मानले शाहरुखचे आभार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने शाहरुख खानचा चित्रपट ‘जवान’वरून काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपने दावा केला की जवान (Jawan ) चित्रपटामध्ये काँग्रेसच्या नेतृत्ववाली यूपीए सरकारच्या १० वर्षाचे भ्रष्टाचार दाखवण्यात आले आहेत. भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये जवान चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि सोबतच भाजप सरकारच्या गेल्या ९ वर्षांतील कामाची गणतीदेखील केली. गौरव भाटिया यांनी लिहिलं की, ‘आपल्याला शाहरुख खानचे आभार मानायला हवेत. कारण, जवान चित्रपटाच्या माध्यमातून २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचार आणि त्यांच्या वाईट नीतींचा खुलासा केला.’ (Jawan )

काय म्हणाले गौरव भाटिया?

गौरव भाटिया म्हणाले, सरकारने पुलवामा हल्ल्याचा सडेतोड उत्तर दिले आणि बालाकोट एअर स्ट्राईक केले. भाटिया यांनी दावा केला की, काँग्रेसच्या शासनका‍ळात देशात १.६ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. एनडीएच्या शासनकाळात शेतकऱ्यांना एमएसपी दिली गेली आणि त्यांच्या बँक खात्यात किसान सम्मान निधी अंतर्गत थेट २.५५ लाख कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. काँग्रेसच्या शासन काळात दिवाळखोर मित्रांना कर्ज दिले. फरारी विजय मल्ल्याने बँकेकडून कर्ज मिळाल्याबद्दल आभार मानले होते. एनडीए सरकारच्या काळात दिवाळखोर कंपन्यांकडून ६.५ लाख कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. गौरव भाटिया यांनी लिहिले की, शाहरुख खानचे आभार, पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली हे मुद्दे आता भूतकाळात गेले आहेत.

शाहरुख खानच्या रिलीज झालेल्या जवान चित्रपटामध्ये पिता-पुत्राची कहाणी दाखवण्यात आली आहे. यामध्यो तो राजकीय नेते आणि उद्योगपतींच्या घाणेरड्या आघाड्यांविरुद्ध लढा देत भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची आत्महत्या, रुग्णालयातील मुलांचे मृत्यू यासारखे संवेदनशील मुद्द्यांवरील चित्रण आहे.

 

Back to top button