पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महसूल विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक सोमवार (दि. २० सप्टेंबर २०२१) रोजी दु. २ वाजता होणार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या झुंबर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सन २०१८-१९ ते सन २०२०- २१ या ३ आर्थिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. ही बैठक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर याच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
तसेच सन २०२०-२१ व सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत कोणती कामे घेण्यात आली आणि या कामांवर किती निधी खर्च झाला याबाबत जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय आढावा घेतला जाणार आहे.
हेही वाचलंत का?