सिन्नर तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण, लसीकरण बंद | पुढारी

सिन्नर तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण, लसीकरण बंद

चांदवड; नाशिक :

सिन्नर तालुक्यात लसीकरण दरम्यान शुक्रवार दि.१७ रोजी आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण झाली. सिन्नर तालुक्यातील घडलेल्या या प्रकाराचा निषेध म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण बंद ठेवण्यात आलं.

शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत पास्ते गावांमध्ये लसीकरण सुरू होते. यावेळी गावातील काही नागरिकांनी लसीकरण केंद्रात कार्यरत असलेल्‍या आरोग्य सेवकांशी भांडणाला सुरूवात केली. या दरम्‍यान गावातील व्यक्तींनी त्यांच्या श्रीमुखातही भडकावली. या गोष्टीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण करण्यात आली.

या घटनेचा जिल्ह्यातील सर्व संवर्ग जिल्हा परीषद कर्मचारी संघटना आणि महाराष्ट राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीनां जो पर्यंत अटक होत नाही. तसेच यापुढे संपूर्ण जिल्हयात प्रत्येक कोविड लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त मिळत नाही. तो पर्यंत संपूर्ण जिल्हयात लसीकरण मोहीम थांबविण्याचा निर्णय आरोग्य कर्मचारी संघटना व जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाने घेतला आहे.

आरोग्य कर्मचारी जिव धोक्यात घालून कोविड लसीकरणाचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. असे असताना आरोग्‍य सेवकांसोबत झालेला हा प्रकार निंदनीय असून, याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज (शनिवार) 18 ते 20 सप्टेंबर असे तीन दिवस किंवा पुढील निर्णय येईपर्यंत देवळा तालुक्यात कुठेही लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार नाही. अशी माहिती देवळा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्य सेवक आणि आरोग्यसेविका संघटना लसीकरण करणार नाहीत. याबाबत कळवले आहे. त्यामुळे आज स्टाफ नसल्याने चांदवडसह जिल्ह्यातील लसीकरण बंद झाले आहे.

संघटनेने अचानक काम बंद केले. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरून पुन्हा घरी परतावे लागले. या प्रकारामुळे नागरिंकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

देशात अवघ्या ९ तासांमध्ये दोन कोटी लसीकरण

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवस भाजपकडून ‘सेवा समर्पण’ दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त दोन कोटी लसीकरण टप्पा गाठण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. या अनुषंगाने देशातील विविध ठिकाणी लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

यामुळे अवघ्या ९ तासांमध्येच ५ वाजून ८ मिनिटांनी देशाने विक्रमी दोन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला. देशाने यापूर्वी केलेला सर्वाधिक लसीकरणाचा स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला.

शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. देशात यापूर्वी एका दिवसात सर्वाधिक १ कोटी ३३ लाख लसीकरणाचा विक्रम नोंदवण्यात आला होता. पंरतु, शुक्रवारी सहा तासांमध्ये दुपारी १.४० वाजता लसीकरणाने १ कोटींचा टप्पा ओलांडला.

तर पुढील १०० मिनिटांमध्ये ३.२० वाजता लसीकरणाचा आकडा दीड कोटींवर पोहोचला. दुपारी चार वाजेपर्यंत १ कोटी ६५ लाखांहून अधिक डोस लावण्यात आले होते.

हे ही वाचा : अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर | Ganesh Festivel Special |

Back to top button