FDA Negligence Adulterated Tea Case: ६ हजार किलो भेसळयुक्त चहा जप्त; १७ वर्षांनी आरोपी निर्दोष, एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

२५० हून अधिक सुनावण्या निष्फळ; पाठपुराव्याअभावी खटला फेटाळला, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
Tea
TeaPudhari
Published on
Updated on

पुणे: एका सजग नागरिकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून पकडलेल्या ६ हजारांहून अधिक किलो विषारी भेसळयुक्त चहाच्या खटल्यात, अन्न व औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली आहे. पुणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ''फिर्यादीने पाठपुरावा न केल्याने'' हे खटले फेटाळले आहेत.

Tea
PMC Garden Department Vacancies: ‘हरित पुणे’च्या दाव्यांना धक्का; महापालिका उद्यान विभागातील ९० टक्के पदे रिक्त

मे २००८ मध्ये सिस्कॉमचे कार्याध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी पुणे येथील भेसळयुक्त चहा विक्रीविरुद्ध तक्रार केली होती. एफडीएने धाड टाकून तब्बल ६,१६३ किलो घातक रंगमिश्रित चहा जप्त केला होता. मात्र, त्यानंतरच्या १७ वर्षांत या खटल्याच्या २५०हून अधिक सुनावण्या होऊनही, एफडीएचे अधिकारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात किंवा पुरावे मांडण्यात अपयशी ठरले. अनेकदा न्यायालयात स्टेप्स अनरेडी म्हणून तारखा मागण्यात आल्या आणि आरोपींवरील वॉरंट बजावण्यासही टाळाटाळ करण्यात आली.

Tea
PMC Road Mitra App Closed: पुणेकरांच्या खड्डे तक्रारींसाठीचे ‘पीएमसी रोड मित्र’ ॲप चार महिन्यांपासून बंद

या गंभीर प्रकारामुळे आता एफडीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पत्राद्वारे दाद मागत, धारणकर यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन, तातडीने उच्च न्यायालयात अपील आणि प्रलंबित खटल्यांच्या ऑडिटची मागणी केली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे भेसळखोरांचे फावत असून, सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे वास्तव या प्रकरणाने चव्हाट्यावर आणले आहे.

Tea
Maharashtra 60000 km Road Development: महाराष्ट्रातील ६० हजार किमी रस्ते होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे; १७ हजार ४०० कोटींचा निधी

दूध भेसळीवर ‘एफडीए’ची छापा

फलटण तालुक्यातील होळ येथील एका गोठ्यालगतच्या खोलीवर सातारा अन्‍न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने रविवारी (दि. १२) सकाळी धाड टाकून गाईच्या दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर, मिक्सर आणि अन्य साहित्य जप्त केले. याप्रकरणी निरा (ता. पुरंदर) येथील पावडर पुरवठादारासह पाच जणांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले, कुणाल दिलीप भोसले, निरा येथील संशयित पुरवठादार गिरीधर जालिंदर मोरे (वय २७) तसेच संबंधित डेअरीचे जबाबदार संचालक किंवा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्‍न सुरक्षा अधिकारी रूपाली अप्पासाहेब खापणे यांनी फिर्याद दिली आहे.

Tea
Maharashtra Rainfall Deficit Update: राज्यात पावसाची विषमता कायम; १६ जिल्ह्यांत तूट, नंदुरबारमध्ये ७४ टक्के कमतरता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळ येथील मंगल भोसले यांच्या गोठ्यालगतच्या खोलीत Whey Permeate Powder Spray Dried आणि Instant Tea Coffee Creamer (Non-Dairy Creamer Spray Dried) हे पदार्थ तसेच त्यांचे मिश्रण करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर आढळला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित पदार्थांचे नमुने घेऊन उर्वरित साठा आणि मिक्सर जप्त केला. हे दूध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीला पुरवले जात असल्याची माहिती समोर आली. तसेच ही भेसळयुक्त पावडर निरा येथील गिरिधर मोरे यांच्याकडून पुरवली जात असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री गिरिधर मोरे याला निरा मार्केट यार्डजवळील राहत्या घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news