PMC Road Mitra App Closed: पुणेकरांच्या खड्डे तक्रारींसाठीचे ‘पीएमसी रोड मित्र’ ॲप चार महिन्यांपासून बंद

ओटीपी सेवाच ठप्प; रस्त्यांवरील खड्डे कायम असताना तक्रार नोंदविण्याचे माध्यमच गायब
PMC Road Mitra App
PMC Road Mitra AppPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना, नागरिकांच्या तक्रारी थेट महापालिकेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेले 'पीएमसी रोड मित्र' हे मोबाईल ॲप गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी याच ॲपवरून खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवाव्यात आणि त्या ७२ तासांत निकाली न निघाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी नुकतेच केले आहे. मात्र, तक्रार नोंदविण्याचे प्रमुख माध्यमच बंद असल्याने महापालिकेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

PMC Road Mitra App
Maharashtra 60000 km Road Development: महाराष्ट्रातील ६० हजार किमी रस्ते होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे; १७ हजार ४०० कोटींचा निधी

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते १२ ऑगस्ट २०२५ रोजी 'पीएमसी रोड मित्र' ॲपचे उद्‌घाटन करण्यात आले होते. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे छायाचित्र किंवा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर संबंधित तक्रार थेट पथ विभागाकडे पाठविली जाईल, ७२ तासांत खड्डा बुजविला जाईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर 'पूर्वी' व 'नंतर'ची छायाचित्रे अपलोड केल्याशिवाय तक्रार निकाली काढता येणार नाही, अशी अत्याधुनिक व्यवस्था या ॲपमध्ये करण्यात आली होती.

PMC Road Mitra App
Maharashtra Rainfall Deficit Update: राज्यात पावसाची विषमता कायम; १६ जिल्ह्यांत तूट, नंदुरबारमध्ये ७४ टक्के कमतरता

मात्र, ११ मार्च २०२६ पासून हे ॲप पूर्णपणे ठप्प आहे. त्यावेळी आयुक्तांनी तांत्रिक अडचण दूर करून सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, चार महिने उलटून गेले तरी ॲप पूर्ववत झालेले नाही. त्यामुळे महापालिका या गंभीर त्रुटीकडे नेमके कधी लक्ष देणार?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

PMC Road Mitra App
Rajgad 11 Teachers Notice: अतिवृष्टीत गावात थांबण्याचे आदेश धुडकावले; राजगडमधील ११ शिक्षकांना नोटिसा

याहून धक्कादायक बाब म्हणजे, ॲप बंद पडण्यामागे तांत्रिक बिघाड नसून, एसएमएस मेसेजिंग पॅकेजचे नूतनीकरण वेळेत न केल्याने ही सेवा बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. ॲपमध्ये नोंदणी करताना ओटीपी, तक्रार क्रमांक आणि कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यासाठी आवश्यक असलेल्या मेसेजिंग सेवेचे नूतनीकरणच महापालिकेने केले नसल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली आहे.

सध्या 'रोड मित्र' ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असले तरी नवीन वापरकर्त्यांना ओटीपी मिळत नसल्याने नोंदणी करता येत नाही. यापूर्वी ॲप डाउनलोड केलेल्या अनेक वापरकर्त्यांनाही सेवा उपलब्ध होत नसल्याचे अनुभव येत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक प्रमुख रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी तक्रारी कुठे करायच्या, याबाबत महापालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था जाहीर केलेली नाही. त्यामुळे खड्ड्यांचा त्रास सहन करायचा आणि तक्रारही करता येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.

PMC Road Mitra App
Pune Shahzad Bhatti Network ATS Raids: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी कनेक्शन? पुणे-पिंपरीत ATS चे छापे

'रोड मित्र'चे उद्दिष्ट काय होते?

  • १२ ऑगस्ट २०२५ रोजी ॲपचे उद्‌घाटन

  • खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडीओ

  • अपलोड करण्याची सुविधा

  • तक्रार थेट संबंधित पथ विभागाकडे

  • ७२ तासांत खड्डा बुजविण्याची हमी

  • संबंधित उपअभियंत्यावर जबाबदारी निश्चित

  • 'पूर्वी' आणि 'नंतर'ची छायाचित्रे अपलोड केल्यानंतरच तक्रार निकाली

  • ओटीपी, तक्रार क्रमांक व कार्यवाहीची माहिती एसएमएसद्वारे

सध्या नागरिकांसमोर काय अडचणी?

  • ११ मार्च २०२६ पासून ॲप बंद

  • नवीन वापरकर्त्यांना ओटीपी मिळत नाही

  • जुने वापरकर्तेही लॉगिन करू शकत नाहीत

  • तक्रार नोंदविण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही

  • शहरभर खड्डे कायम, पण ऑनलाइन तक्रार अशक्य

  • ७२ तासांत कारवाईच्या घोषणेच्‍या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह

काही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. संबंधित पथक त्यावर काम करत असून, आज उशिरा संध्याकाळपर्यंत सेवा पुन्हा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news