..अन् ‘त्या’ रिक्षाचालकांवर कारवाई सुरू

..अन् ‘त्या’ रिक्षाचालकांवर कारवाई सुरू
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील रिक्षाचालक शाळेतील लहान मुलांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करीत आहेत. याबाबत बुधवारी (दि. 12) 'पुढारी'मध्ये 'चिमुरड्यांच्या जीवाशी खेळ' या मथळ्याखाली एक छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. याची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी तत्काळ संबंधित रिक्षावर कारवाई करीत दीड हजार रुपयांचा दंड केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये रिक्षाचालक शाळेतील लहान मुलांची वाहतूक करतात. यामध्ये बहुतांश रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक मुलांना बसवून प्रवास करीत असल्याचे दिसून येते. काही रिक्षांमध्ये तर अक्षरशः जनावरे कोंबल्यासारखे लहान मुले बसवली जातात.

दरम्यान, पुढारीने बुधवारी चिंचवड स्टेशन येथे एका रिक्षाचा फोटो प्रसिद्ध केला. रिक्षामध्ये शाळेतील चिमुरड्या मुली दाटीवाटीने जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे दिसून आले. या फोटोची पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली. संबंधित रिक्षाच्या क्रमांकावरून दीड हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच दिवसभर वाहतूक पोलिसांनी इतरही रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. शाळा सुटण्याच्या वेळेत ठिकठिकाणी वाहतूक पोलिस रिक्षांची तपासणी करीत असल्याचे दिसून आले. यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी पुढारीला सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news